अकोला

संतापजनक; शाळकरी विद्यार्थ्याकडून कोविड सेंटरच्या टॉयलेटची सफाई

विवेक मेतकर

बुलडाणा : जगात कोरोनाने (Corona Virus) हाहाकार माजविला असताना दुसरी , तिसरी लाट येणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे , तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याचही भाकित तज्ज्ञांनी वर्तविलं असताना मात्र बुलडाण्यात (Buldana) एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. (Covid Center toilet got Cleaned by School Boy in Sangrampur Buldana District)

आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात 15 कोरोनाबाधित रुग्ण असताना तेथील स्वछता गृह एका चिमुरड्या 8 वर्षाच्या मुलाकडून हाताने साफसफाई करून घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मुलाला साफसफाई करण्यासाठी धमकविण्यात आलं.

प्रशासना विरोधात संतापाची लाट

तिसऱ्या वर्गात शिकणारा हा पीडित बालक घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने मामाच्या घरी राहून हा मुलगा मामालाही मजुरी करण्यात मदत करतो.परवा बुलढाणा जिल्हाधिकारी संग्रामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना या मारोड या गावात येतील या भीतीने पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या आदेशाने तात्काळ येथील विलगीकरण कक्षाची साफसफाई करण्याचा आदेश देण्यात आला.

हाताने साफ करायला लावले टॉयलेट

गावात कुणीही नसल्याने चक्क प्रशासनाने या बालकाला या विलगीकरण कक्षाच्या स्वछता गृहाची साफसफाई करण्यासाठी 50 रुपयांचं आमिष दाखवीलं. बालकाने नकार दिल्यावर त्याला काठीने मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे बालकाने विलगीकरण कक्षात प्रवेश करून अक्षरशः हाताने टॉयलेट साफ केली. यावेळी या विलगिकरण कक्षात 15 कोरोना बाधित रुग्ण होते !

दरम्यान समाज माध्यमात या प्रकाराचा व्हिडीओ समाज माध्यमात वायरल होताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना निवेदन देऊन या बाल मजुरीच्या प्रकाराबद्दल दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान हा बालमजुरीचा प्रकार असून यात जिल्हाधिकाऱ्यांसह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचं जेष्ठ समाजसेवक भाऊ भोजने यांनी म्हटलं आहे. Covid Center toilet got Cleaned by School Boy in Buldana District

या सर्व किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ वायरल झाल्यावर आम्ही संग्रामपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री पाटील यांचेशी संपर्क करून घटनेबद्दल विचारणा केली असता " या घटनेबद्दल मला अधिकृत माहिती नसून कशाला आमची सुट्टी खराब करता बातम्या लावून .....! " असं बेजवाबदार उत्तर दिलं तर प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या घटनेबद्दल बोलण्यास तयार नाही...!

अश्या घटना जऱ घडत असतील तर हॉटस्पॉट असालेल्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कशी कमी होईल तसेच या घटनामुळे मात्र लहान बालकांमध्ये कोरोना संक्रमन वाढण्यास बुलढाणा जिल्हा प्रशासन खत पाणी तर घालत नाही ना....? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संपादन - विवेक मेतकर

Covid Center toilet got Cleaned by School Boy in Sangrampur Buldana District

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT