अकोला

Cyber Fraud: सैन्य दलात असल्याचे भासवून फसवणूक! सायबर भामट्यांपासून रहा सावध; पोलिस अधीक्षकांचे आवाहन

सैन्य दलात असल्याचे भासवून, फोन करून आणि व्हॉटस ॲपच्या माध्यमातून फसवणूक करण्यात येतआहे. या संदर्भात अकोला जिल्हा केमिस्ट आणि ड्रग्ज असोसिएशनने तक्रार दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Cyber Crime Akola: सैन्य दलात असल्याचे भासवून, फोन करून आणि व्हॉटस ॲपच्या माध्यमातून फसवणूक करण्यात येतआहे. या संदर्भात अकोला जिल्हा केमिस्ट आणि ड्रग्ज असोसिएशनने तक्रार दिली आहे. त्यामुळे अशा सायबर फसवणुकीपासून सर्तक राहण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे.


पोलिस अधीक्षक कार्यालयात ता.१२ जानेवारी २०२४ रोजी औषध विक्रेत्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तोतया सैन्य अधिकारी असल्याचे भासवून फोन कॉल व हॉट्स ॲपद्वारे औषध व जनरल वस्तूची मागणी केली.

स्वतः सैन्य दलाचा अधिकारी असल्याचे सांगून दबाव टाकून दिलेल्या ऑडरचा माल पाठवा, पेमेन्ट करतो असे सांगून क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड व युपीआय पेमेन्ट बद्दल गोपनिय माहिती विचारतो. काही सभासद दबावाला बळी पडून त्यांना गोपनिय माहिती देतात व त्यांचे सोबत सायबर फॉड होवून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वळती करतात. ते त्यांचे वेगवेगळे मोबाईल क्रमांकाचा वापर करून जनतेची आर्थिक फसवणूक करतात. असा आशयाचे निवेदन पोलिस अधीक्षक अकोला यांना दिले होते.

पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सदर निवेदनाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांना चौकशी करून तपास करण्याचे आदेश दिल्याने त्यांनी स्वतः जातीने लक्ष देवून संबंधित सर्व मोबाईल क्रमांकाचे अकोला सायबर येथून तांत्रिक विश्लेषण केले असता वरील सर्व क्रमांक हे बनवट असून, त्यांचे लोकेशन हे राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणचे जंगलातील असल्याचे विश्लेषणावरून निष्पन्न झाले.

सदर प्रकरणाची पडताळणी अर्जदार यांचे समक्ष करण्यात आली. त्यांना तसे समज देण्यात आले होते. एका व्यक्तीस शेतात सोने सापडले असून, कमी किंमतीत सोने देतो, परंतु राजस्थान येथे यावे लागेल असा फोन आला होता. सोन्याचे फोटो देखील पाठविले होते. हा मोबाईल क्रमांक सुध्दा फ्रॉड होता. त्यामुळे जनतेने कोणत्याही अमिशाला बळी न बळता फसव्या कॉलला प्रतिसाद देवू व संबधित मोबाईल नंबर ब्लॉक करावे व कुठल्याही आकर्षक जाहिरातीला प्रलोभित होवून बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.

अशी करतात फसवणूक
- सैन्य दलातील अधिकारी असल्याचे भासवुन केटरींगचे ऑडर देण्याचे सांगुन फसवणुक करतात.
- सैन्य दलातील अधिकारी असल्याचे भासवुन बदली झाल्याचे आहे असे सांगुन घरातील जुने सामान, कार, मोटारसायकल विकणे असल्याचे सांगून अमिष दाखवुन बँक डिटेल घेवून फसवणूक करतात
-ओळखीच्या लोकांचे सोशल मीडिया अकांऊट तयार करून पैसांची मागणी करतात.
- आम्हाला शेतात खोद काम करत असताना गुप्तधन, सोने मिळालेले आहे तरी ते आम्ही तुम्हाला अर्धा किंमतीत देतो असे सांगून फसवणूक करतात.
...................
माहिती देवू नये
फसव्या जाहिराती करून किंवा आमिष दाखवून कोणी फोन कॉल किंवा व्हॉटस् ॲपद्वारे माहिती मागितल्यास कोणीही आपले बॅक डिटेल, यु.पी.आय. डिटेल अथवा ओ.टी. पी. देवू नये, असे आवाहन अकोला पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT