आहार आणि विहारातून डायबेटिसचे उच्चाटन शक्य sakal
अकोला

आहार आणि विहारातून डायबेटिसचे उच्चाटन शक्य

जापीमध्ये रिसर्च पेपर सादर; पत्रकार परिषदेत माहिती

सकाळ वृत्तसेवा

अकोला : डायबेटीस अर्थात मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आयष्यभर औषध किंवा इंसुलिन घ्यावे लागतात, असा समज समाजात पसरलेला आहे. तसंच डायबेटीसमुळे हृदयरोग, हार्ट अटॅक, किडणी फेल्युअर, नजर कमजोर होणे अशा समस्यांचा तरुण पिढीही सामना करावा लागतो. यावर रामबाण उपाय मिळाला असून आयुर्वेदातील पंचकर्म पद्धतीने टाईप २ डायबेटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासोबतच योग्य आहार व विहारातून सुद्धा डाबेटीसचे उच्चाटण होऊ शकतो, असे संशोधनाने सिद्ध झाले आहे, अशी माहिती डॉ. उन्मेष पनवेलकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉक्टर रवि शाबाराजी, डॉ. आशा शाबारानी, डॉ कल्याणी बेलोरकार, डॉ. तप्ति तिजारे, निलेश पाटील उपस्थित होते. डायबेटीसवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत अनेक संशोधन करण्यात आले. अनेक जाहिरातीतून दावा सुद्धा करण्यात आला, परंतु त्यानंतर सुद्धा मधुमेही रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसून येत नव्हती.

त्यात आयुर्वेदिक पंचकर्म व डाएटच्या मतदीने डायबेटीस रिव्हर्स होऊ शकतो, या विषयी लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होत. आयुर्वेदिक ट्रिटमेंट सगळ्यांनाच सूट होत नाही. आयुर्वेदिक ट्रिटमेंटने आजार बरा व्हायला खूप उशीर लागतो, शिवाय आयुर्वेदिक पंचकर्म चालू आहे तोपर्यंत कदाचित डायबेटीस कंट्रोलमध्ये दिसेलही पण ट्रिटमेंट थांबवल्या नंतर डायबेटीस कंट्रोलमध्ये राहील का? पुन्हा डायबेटीस होणार नाही का?अशा गैरसमजातून निर्माण झालेल्या या प्रश्नांनी आयुर्वेदावर नेहमी शंका दाखवली जाते. याच अनुषंगाने आयुर्वेदाविषयी असलेली शंका आणि डायबेटीस रुग्णांच्या मनात येणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणून आयर्वेदिक पंचकर्म पद्धतीने उपचार करण्यासाठी सन् २०१८ मध्ये एकूण ८२ टाईप २ डायबेटीस रुग्णांच्या जीवनशैलीवर संशोधन सुरु केलं. आयुर्वेदा अँड डाएटरी मॉडिफिकेशन फॉर टाईप २ डायबेटीस मॅनेजमेंट हे त्या संशोधनाचं नाव. टाईप २ डायबेटीस रुग्णांच्या जीवनशैली विषयीचा अभ्यास किंवा ते संशोधन असं होतं की, तीन महिने डाएट बॉक्स व डायबेटीस रिव्हर्सल पंचकर्म ट्रिटमेंट घेऊन जे रुग्ण जिटीटी टेस्ट (ग्लकोज टॉलरन्स टेस्ट) पास झाले होते. म्हणजेच ७५ ग्रॅम साखर खाऊनसुद्धा ज्यांची शुगर नॉर्मल आली होती.

८२ पैकी ६७ रुग्णांची चाचणी सामान्य

संशोधण करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर पचवण्याची क्षमता सामान्य, नॉन डायबेटीक लोकांप्रमाणे झाली होती. अशा रुग्णांना वर्षभर डायबेटीसची कोणतीही ॲलोपॅथी औषधं न देता डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा एका वर्षाने त्यांची जिटीटी टेस्ट (ग्लकोज टॉलरन्स टेस्ट ) करून तीन महिन्यांची एव्हरेज दाखवणारी गोल्ड स्टॅण्डर्ड चाचणी करण्यात आली एक वर्षानतर एकूण ८२ रुग्णांपैका ७६ रुग्णाची चाचणी सामान्य आली, असा दावा डॉ. उन्मेष पनवेलकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT