अकोला ः जुनेशहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाशीम बायपास जवळील एका अपार्टमेंटसमोरून १२ हजार लिटर डिझेल-पेट्रोलने भरलेला टँकर ता. २६ जूनच्या रात्री चोरीला गेला होता. हा टँकर पोलिसांना पिंजरजवळ आढळून आला. (Diesel tanker hijacked from Washim bypass)
गायगाव येथून नांदेडसाठी टँकर क्रमांक एम.एच.३०-एबी- २९९९ यामध्ये सहा हजार लिटर डिझेल आणि सहा हजार लिटर पेट्रोल भरून निघाला होता. मात्र, टँकर नादुरुस्त झाल्याने तो वाशीम बायपासवर दुरुस्तीसाठी उभा करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत टँकर दुरूस्तीचे काम न झाल्याने टॅंकरचा चालक सैय्यद फारूक सैय्यद मुजफ्फर जुने शहर येथील हमजा प्लॉट येथे घरी निघून गेला.
याच ठिकाणी महेश मनोहरलाल चावला यांचा यवतमाळसाठी पेट्रोल-डिझेल घेऊन जाणार आणखी एक दुसरा टॅंकर उभा होता. यवतमाळसाठी जाणारा टॅंकर २६ जून रोजी सकाळी पिंजरमार्गे यवतमाळसाठी निघाल्यानंतर या टँकरचा चालक मोहम्मद हारून याला रात्री दुरुस्तीसाठी उभा असलेला टॅंकर क्रमांक एम. एच.३०-ए. बी.२९९९ पिंजर जवळ रोडच्या कडेला उभा असल्याचे दिसले.
यावरून नांदेडसाठी निघालेला टॅंकर या दिशेने कसा आला, याची माहिती मोहम्मद हारून याने टॅंकर मालक महेश चावला यांना दिली. त्यावरून चावला यांनी नमूद टँकरबाबत चालक सैय्यद फारूक याला विचारले असता, त्याने टॅंकर बायपास येथे उभा केला होता असे सांगितले. एकूणच प्रकारावरून टॅंकर चोरी झाल्याचे चावला यांच्या लक्षात आल्यावर या प्रकरणाची तक्रार जुनेशहर पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून कलम ३७९ नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती जुने शहर पोलिस स्टेशनेचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी दिले.
Diesel tanker hijacked from Washim bypass
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.