Akola News : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष , मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला चे ब्रँड अँबेसिडर व शिवाजी महाविद्यालय अकोला चे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात ८ एप्रिल रोजी रेल्वे स्टेशन परिसरात मतदार साक्षरता अभियान राबविण्यात आले.
रेल्वे स्टेशन कार्यालयातील कर्मचारी, परिसरातील दुकानदार, व्यावसायिक, हमाल, ऑटो चालक व प्रवाशांशी मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोलाचे ब्रँड अँबेसिडर डॉ.विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सर्व सदस्यांनी संवाद साधून मतदान करणे का आवश्यक आहे ? याविषयी जनजागृती केली. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. विशेषतः दिव्यांग मतदार, नवमतदार व महिला मतदारांशी चर्चा केली.
दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपी , मदतनीस व व्हीलचेअरच्या माध्यमाने मतदान केंद्रावर आपले मतदान करता येईल याविषयी डॉ.कोरडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व प्लॅटफॉर्मवर जाऊन प्रत्येकाशी संवाद साधून मतदार साक्षरता अभियान राबवण्याचे राष्ट्रीय कार्य दिव्यांग सोशल फाउंडेशनद्वारा करण्यात आले.
यावेळी रेल्वे स्थानक परिसरात मी मतदान करणार आम्ही मतदान करणार अशा घोषणा सर्वांचे लक्ष वेधित होत्या. २६ एप्रिलपर्यंत डॉ. विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला संपूर्ण अकोला जिल्ह्यात मतदार साक्षरता अभियान राबवणार आहे.
विशेषतः दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे व त्यांना मदतनीस उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान अग्रणी दूत डॉ. विशाल कोरडे यांनी केले आहे.
मतदार साक्षरता अभियानाच्या या सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे अस्मिता मिश्रा, अनामिका देशपांडे, सिद्धार्थ ओवे, गणेश सोळंके , विजयकुमार वणवे, सुजाता आसोलकर, संजय फोकमारे व विजय कोरडे यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.