displeasure over Congress executive positions given to those who displeasure resignation of office bearers to District President Sakal
अकोला

Akola News : काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीवरून नाराजीचे ‘फटाके’

नाराजीचा सूर आवळणाऱ्यांना दिली पदे; पदाधिकाऱ्यांचा जिल्हाध्यक्ष्‍यांकडे राजीनामा

मनोज भिवगडे

अकोला : जिल्हा काँग्रेस कमिटीची जम्बो विस्तारित कार्यकारिणी रविवारी (ता.१९) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेनंतर जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी जाहीर केली. गेले काही महिन्यांपासून थेट जिल्हाध्यक्षांविरुद्धच नाराजीचा सूर आवळत बैठका घेणाऱ्यांना या कार्यकारिणीत महत्त्वाची पदे देण्यात आली आहे. त्यावरून आता पक्षांतर्गत नाराजीचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली असून, काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे सोपविले आहे.

अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये गेले काही महिन्यांपासून नाराजीचा सूर होता. ही नाराजी नेत्यांनी जिल्हाध्यक्षांच्या विरोधात बैठका घेवून उघडपणे जाहीर केली होती. काँग्रेसतर्फे दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविणारे हितायत पटेल यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांचा सहभाग असलेल्या नाराज नेत्यांच्या गटाकडून अकोट, बार्शीटाकळी येथे बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या.

या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षनिरीक्षकांनाही पाठविले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही नाराजीचा सूर उमटला होता. कार्यकारिणी जाहीर न करण्यासोबतच पक्षांतर्गत उपक्रमांना लागलेल्या ब्रेकमुळे ही नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

त्यावर तोडगा म्हणून आता दोन वरिष्ठ उपाध्यक्षांसह २६६ जणांचा समावेश असलेली जम्बो कार्यकारिणी रविवारी जाहीर करण्यात आली. मात्र, ही कार्यकारिणी जाहीर होताच अनेक नेत्यांनी पुन्हा नाराजीचा सूर काढत राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.

उपाध्यक्ष संजय बोडखे यांनी सोपविला राजीनामा

नव्याने जाहीर करण्यात आलेल्या विस्तारित कार्यकारिणीत २९ उपाध्यक्षांमध्ये १६ व्या क्रमांकावर असलेले अकोट तालुक्यातील नेते उपाध्यक्ष प्रा. संजय बोडखे यांनी कार्यकारिणीत काम करण्यास असमर्थता दर्शवित जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे.

त्यात त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे. आणखी काही नेते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. बार्शीटाकळीमध्ये धाबेकर गटाच्या विरोधातील नेत्यांना कार्यकारिणीत स्थान मिळाल्याने सुनील धाबेकर यांचे समर्थकांनी नाराजी व्यक्त करीत राजीनामा देण्याची तयारी चालविली असल्याची माहिती आहे.

काँग्रेसच्या कार्यकारिणीत इतर पक्षातील कार्यकर्ते

जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर केलेल्या कार्यकारिणीत चक्क इतर पक्षातील कार्यकर्त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडी, भाजप व लोकजागर मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

विस्तारित जिल्हा कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांची संख्या

वरिष्ठ उपाध्यक्ष ः दोन

कोषाध्यक्ष ः एक

उपाध्यक्ष ः २९

सरचिटणीस ः ७०

चिटणीस ः ८२

सहचिटणीसः ८१

प्रसिद्धी प्रमुख ः एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT