Dr. SS Banerjee sakal
अकोला

Akola Crime : नॅचरोपॅथीचा डॉक्टर करीत होता ॲलोपॅथीची प्रॅक्टिस; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

नॅचरोपॅथी व योगाचे प्रमाणपत्र असलेला एक बंगाली डॉक्टर बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीत ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करताना आढळून आला.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - नॅचरोपॅथी व योगाचे प्रमाणपत्र असलेला एक बंगाली डॉक्टर बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीत ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करताना आढळून आला. मुळव्याधीच ऑपरेशन करून एका रुग्णांची फसवणूक केल्याचा प्रकारानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चौकाशीनंतर या डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डॉक्टर सध्या फरार आहे.

डॉ. एस.एस. बॅनर्जी उर्फ प्रोबीर संतोष सरकार असं या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. तो मुळचा पश्चिम बंगालचा आहे. गेले १५ वर्षापासून तो बोरगाव मंजू येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहे. धोतर्डी येथील दोघांना मूळव्याधीचा त्रास होता. सरकारने ऑपरेशन करून त्यांना पूर्णपणे बरे करतो असे सांगून त्या दोघांचेही मुळव्याधीचे ऑपरेशन केले. त्यासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपये फी आकारली.

मात्र, उपचाराचा कोणताही लाभ न झाल्याने दोन्ही रुग्णआंनी डॉक्टरकडे याबाबत जाब विचारला व उपचाराची रक्कम परत मागितली. यावेळी त्याने रक्कम देण्यास नकार दिला. त्यांनी या प्रकरणाची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे केली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली पवार यांच्याकडे चौकशी सोपवली.

डॉ. पवारांनी केलेल्या तपासात डॉ. एस. एस. बॅनर्जी नॅचरोपॅथीक व योगाचे प्रमाणपत्र असताना ॲलोपॅथीची प्रॅक्टीस करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे बॉम्बे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्रही आढळले नाही. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवला.

त्यांच्या आदेशावरून डॉ. एस.एस. बॅनर्जी उर्फ प्रोबीर संतोष सरकार याच्याविरूद्ध बोरगाव मंजू पोलिसांत डॉ. रूपाली पवार यांनी तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी कलम ३३ महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम १९६१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT