अकोला ः शहाण्यांनी कोर्ट आणि रुग्णालयाची पायरी चढू नये या म्हणीची प्रचिती सर्वसामान्यांना आता कोरोना काळात येत असल्याची स्थिती आहे. कारण, टाळेबंदीत मंदावलेले रुग्णामुळे आर्थिक तोट्यात सापडलेल्या शहरातील बड्या खासगी रुग्णालयांनी आता प्राथमिक तपासणी फी पासून इतर तपासण्यांची फीमध्ये दुप्पटीने वाढ केला असल्याची स्थिती आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
शिक्षणासोबतच मेडिकल हब म्हणून ओळख असलेल्या वऱ्हाडातील अकोला शहरात बुलडाणा, अमरावतीसह वाशीममधील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. मार्चमध्ये कोरोनामुळे लाॅकडाउन करण्यात आले आणि अनेक बड्या खासगी रुग्णालयातील रुग्णसंख्या आटली. त्यामुळे रुग्णांलयाच्या देखभाल दुरुस्तीसह स्टाफचे वेतनाचा बोझा या रुग्णालयावर येऊन ठेपला होता. हळहळू लाॅकडाऊन सैल करण्यात आले आणि आता आपण अनलाॅकमध्ये असताना या खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, ही सख्या पाहूनच या रुग्णालय संचालकांनी प्राथमिक तपासणी फी ते इतर आजारांच्या तपासणी फीमध्ये वाढ केली असल्याची स्थिती आहे. यामुळे आधीच बेरोजगारी आणि आर्थिक तंगीत अडकलेल्यांना नाहक आर्थिक फटका बसत आहे.
आयएमएचे नसते नियंत्रण
खासगी रुग्णालयातील भरमसाठ फी वाढीसंदर्भात आयएमएच्या काही पदाधिकाऱ्यांचे मते जाणून घेतले असता रुग्णालयांच्या फि निश्चिती संदर्भात आयएमएचे यावर कुठलेही नियंत्रण नसते. कोणी जनहितार्थ चालवू शकतात तर काही जण त्यांच्या सोईनुसार फी आकारू शकतात असे मत त्यांनी व्यक्त केले आहेत.
कोरोनानंतर असेच सुरू राहणार का
सध्या रुग्णालय संचालकांना रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीसह रुग्णालय सॅनिटाईज करणे, कर्मचाऱ्यांचा विमा काढणे, हॅंडग्लोज, पीपीई कीट, यासह मास्क आणि इतर साहित्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे रुग्णांकडून तो खर्च वसूल केल्या जात आहे. मात्र, आता सुरू करण्यात आलेली ही परंपरा कोरोनानंतरही अशीच सुरू राहणार का आणि वैद्यकीय धर्माचे काय असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
खासगी रुग्णालयातील फी दरवाढीवर कोणाचेच नियंत्रण नसते. मात्र, खासगी रुग्णालयातील फी निश्चिती संदर्भात शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून, ही प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्णत्वास जाणार आहे.
-डाॅ. रियाज फारूकी, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.