धामणगावरेल्वे : पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिक धास्तावला आहे. मात्र या सर्वांवर एक नामी उपाय एका शेतकऱ्याच्या पोराने शोधून काढला आहे. वाघोली गावातील सुबोध नीतेश भगत या देशी रँचोने केलेला हा अफलातून जुगाड पाहता ही गाडी जर बाजारात आली तर सध्याच्या इलेक्ट्रिक बाईक बनविणाऱ्या कंपन्यांना मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान, आता त्याने जुगाड गाडीनंतर ई-बाईक बनविली आहे.
या बाईकला गेअर आहेत तसेच चालू गाडीत याची बॅटरी स्वयं चार्जिंग होते. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे हे एक कौशल्य आहे. आपल्या गतिशील विचारांना प्रेरित करणारी एक प्रेरणा आहे.
वापरा आणि फेका, या संकल्पनेला आळा घालण्यासाठी आपल्याला शाळेत जाण्याची सोय व्हावी म्हणून येथील सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याने चक्क भंगारमधील इंजिन घेऊन चारचाकी गाडी बनविली.
या जुगाड गाडीनंतर त्याने ई-बाईक बनविली आहे. ही ई-बाईक बनविण्यासाठी जवळपास तीस हजार रुपये खर्च आला. या बनवलेल्या इलेक्ट्रिक गाडीला पाहण्यासाठी व या गाडीची राइड मारण्यासाठी युवकांनी वाघोली गावात गर्दी केली आहे.
पेट्रोल व डिझेलच्या गाड्यांचे मेंटेनन्स खूप जास्त असते. त्यामुळे आता ई-बाईक तयार केली असून याला गेअर आहेत. तसेच चालू गाडीत याची बॅटरी स्वयं चार्जिंग होते. यासाठी वडील नीतेश भगत, आजोबा गौतम भगत, मार्गदर्शक शिक्षक राम बावसकर यांची मदत मिळाली.
-सुबोध भगत, वाघोली.
इंधनाशिवाय ही इलेक्ट्रिक गाडी चालते. त्यामुळे इंधन खर्च, पर्यावरण शुद्ध राखणे चार्जिंगसाठी लागणारी वीज आणि वेळ, अशी अनेक प्रकारे बचत होते. अर्थातच शंभर टक्के मोफत चालणारी ई-बाईक सुबोध भगत याने तयार केली आहे. त्याच्या सृजनशील वृत्तीला महाविद्यालयातर्फे निश्चितच पाठबळ दिले जाईल.
-प्रशांत शेंडे, प्राचार्य, सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.