गणेश डांगे यांनी ड्यूटीवर हजर होण्यापूर्वी एका खासगी डॉक्टरचे प्रमाणपत्र लावले आहे. तो डॉक्टर नवजात शिशू व बालरोग तज्ज्ञ असल्याचे प्रमाणपत्रावरून दिसून येते.
अकोला : राज्य परिवहन अकोला (State Transport Akola) कार्यालयामार्फत विभाग नियंत्रकांनी केलेल्या बदल्यांमध्ये अनियमतता झाल्याचा आरोप एसटी कामगारांनी (ST Workers) केल्यानंतर प्रकरण वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहचले आहे. विभाग नियंत्रकांनी पाठिशी घातलेल्या गणेश डांगे यांच्यामुळे उर्वरित १२ कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. ते सुद्धा त्यांची बदली रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे रेटून धरत आहेत.
दरम्यान, एसटी कामगारसेना, कास्ट्राईब संघटनेने ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेवून राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला कार्यालयासह मुंबई व नागपूर कार्यालयाकडे याप्रकरणाबाबत चौकशीची मागणी केली.
‘सकाळ’मध्ये ११ जुलैच्या अंकात ‘अकोला विभागात बदलीबाबत अनियमितता, विशिष्ट कर्मचाऱ्यांना सोईनुसार पदस्थापना’ या आशयाचे वृत्त प्रकाशित होताच एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली. विषय असा होता की, प्रशासकीय कारणास्तव अकोल्यातील १३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या १ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आल्या होत्या. यापैकी गणेश डांगे हे कर्मचारी सोडून इतर १२ कर्मचाऱ्यांनी आदेशाचे पालन करीत बदली झालेल्या ठिकाणी रूजू होण्यात तत्परता दाखवली.
मात्र, डांगे १ जानेवारी २०२४ पासून गैरहजर होते. त्यांना अचानक ९ जुलैरोजी त्यांची बदली रद्द करून तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक शाखेत कामगिरी करावी, असे पत्र विभाग नियंत्रकांनी काढले. मात्र, या प्रकाराची माहिती उघड झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला. विशेष म्हणजे, गणेश डांगे यांची झालेली बदली ही नियमात असून ती कोणत्याही कारणास्तव रद्द करता येणार नाही. याबाबत त्यांनी प्रादेशिक व्यवस्थापक राज्य परिवहन नागपूर कार्यालय यांना दि. १९ जून २०२४ रोजी लेखी कळवले होते. आता त्याच विभाग नियंत्रकांनी त्याच कर्मचाऱ्याची नियमात झालेली बदली नियमबाह्य केली हे उलगडणारे कोडे आहे असे दिसून येते.
कोणत्याही कर्मचाऱ्याच्या प्रतिनियुक्तीसाठी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांची परवानगी आवश्यक असते. याप्रकरणात विभाग नियंत्रकांनी तशी परवानगी घेतली नाही. विशेष म्हणजे, ठाणे विभागातून एक महिला कर्मचारी अकोल्यात प्रतिनियुक्तीवर आल्या त्यांच्याकडे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांची परवानगी आहे.
गणेश डांगे यांनी ड्यूटीवर हजर होण्यापूर्वी एका खासगी डॉक्टरचे प्रमाणपत्र लावले आहे. तो डॉक्टर नवजात शिशू व बालरोग तज्ज्ञ असल्याचे प्रमाणपत्रावरून दिसून येते. या प्रमाणपत्र कुठल्याही आजाराचा उल्लेख नसून ते कधीपासून ते कधीपर्यंत आजारी होते याचाही उल्लेख नाही. हा मुद्दा कर्मचाऱ्यांनी उचलून धरला असून आता गणेश डांगे यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे.
नागपूरचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी ८ जुलैला विभाग नियंत्रकांच्या दालनात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. टेंडर मंजूर करून डांगे यांची बदली रद्द करून घेतली.
-प्रभाकर गोपनारायण, सेवानिवृत्त आस्थापना पर्यवेक्षक तथा विधी सल्लागार कास्ट्राईब कर्मचारी परिवहन संघटना अमरावती प्रदेश
आमच्याकडे काही विभागात कर्मचारी कमी आहेत. कामकाज सुरळीत होण्याच्या दृष्टीने डांगे यांची बदली रद्द केली आहे. ती नियमानुसारच आहे.
-शुभांगी शिरसाठ, विभाग नियंत्रक, अकोला
बदलीचा विषय हा माझा नसून विभाग नियंत्रकांचा आहे. त्यांना सर्व अधिकार आहेत. कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसारच करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
-श्रीकांत गभणे, प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.