अकोला - स्टायलीश लूकसह महागड्या कारसोबत रिल बनवण्यासाठी शहरातील एका नामांकित शाळेतील चार विद्यार्थ्यांनी एमआयडीसी भागातील महिंद्रा फोर व्हिलर स्टॉक यॉर्डमधून नव्या कोऱ्या महागड्या कार चोरल्या. एवढेच नाहीतर सोशल मिडीयावर कारसह रिलही बनवल्या.
मात्र चोरून नेलेल्या कारपैकी एक कार शोरूमच्या एका कर्मचाऱ्याला दिसून आल्याने याप्रकरणाचे बिंग फुटले. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांसह एकास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तिन्ही कार जप्त केल्या आहेत.
सविस्तर असे की, एमआयडीसी पोलिस स्टेशनअंतर्गत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीतील एक कर्मचारी व त्यांचा मित्र मोटारसायकलने फिरत असताना त्यांनी महिंद्रा फोर व्हिलर स्टॉक यॉर्डमधील नंबर नसलेली नवीन फोर व्हीलर गाडी एक्स ७०० गाडी (किंमत २६ लाख) ही अकोला शिवणी विमानतळाकडे जात होती. गाडीमध्ये दोघे दिसून आले.
त्यांना आवाज देवून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता ने गाडी पळून गेले. त्यानंतर स्टॉक यॉर्डमध्ये जावून पाहीले असता फोर व्हीलर गाडी एक्सयूव्ही ७०० (स्पेशल एडीशन ब्लेज मॅटफिनिश) लाल रंगाची गाडी दिसून आली नाही. त्यावरून अज्ञात व्यक्तीनी ही कार चोरून नेल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसात देण्यात आली.
अधिक शोधाशोध केली असता शोरूम येथील स्टॉक यॉर्डमधून दोन महिंद्रा एक्सयूव्ही ७०० व एक महिंद्रा स्कॉर्पीओ एन झेड टू अशा तीन महागड्या कार गायब असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शोरूमतर्फे ६ मेरोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार देण्यात आली.
त्यावरून पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे व एसडीपीओ सतीश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक वैशाली मुळे यांनी तपास सुरु केला. तेव्हा त्यांना धक्कादायक माहिती समोर आली. या महागड्या कार अल्पवयीन मुलांनी चोरल्याचे तपासात समोर आले. कारची चोरी मुलांनी सोशल मिडीयावर रिल बनवण्यासाठी केली असल्याचे पोलिस अधिक्षक बच्चनसिंह यांनी सांगितले.
पाच जणांना अटक
पोलिसांनी याप्रकरणात मिर्झा अबेद बेदमिर्झा सईद बेग रा. कलाल चाळ अकोला याच्यासह चार अल्पवयीन मुलांना अटक केली. शिवाय त्यांच्याकडून एकुण तीन गाड्या जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये दोन महिंद्रा गाड़ी एक्सयूव्ही ७०० (प्रत्येकी किंमत २६ लाख) एकुण ५२ लाख रुपये तसेच एक महिंद्रा स्कॉपिओ एन झेड टु पांढ-या रंगाची गाडी (किंमत १७ लाख रुपये) तसेच गुन्हयात वारलेल्या दोन मोटर सायकल प्रत्येकी किंमत ५० हजार रूपये एकुण १ लाख रूपये असा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक वैशाली मुळे, उपनि सुरेश वाघ, एएसआय विजय जामनिक, एएसआय राठोड व पोहेका विजय अंभोरे, अजय नागरे, मोहन दराळे, सुनिल टाकसाळे, उमेश इंगळे, पोकॉ मोहन भेडारकर, भुषण सोळंके, अनुप हातोळकर,सविन धनबहादुर,निलेश वाकोडे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.