अकोला

राजस्थानातून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाउंट बनवून पैशांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाने फेसबुक (एफबी) वर बनावट अकाउंट तयार करुन एका व्यक्तीला पैशांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. ५) समोर आला. सदर बनावट अकाउंटवरुन आणखी काही जणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या आहेत. हॅकर्सच्या या प्रकारानंतर जिल्हाधिकारी यांच्या तक्रारीवर सायबर पोलिसांनी तपास सुरु केला असून बनावट अकाउंट बंद करण्यात आले आहे. (Fake account of Akola District Collector demands money from Rajasthan)

सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचं ‘जितेंद्र पापळकर’ या नावाने फेसबुक अकाऊंट आहे. याच नावाने फेसबुकवर सायबर गुन्हेगारांनी एक बनावट अकाऊंट सुरु केलं आहे. शुक्रवारी (ता. ५) संध्याकाळनंतर अकोल्यातील काही प्रतिष्ठीत मंडळींना या बनावट अकाऊंटवरून ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठविण्यात आल्यात. अकोल्याच्या माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचा मुलगा अखिलेश व प्रा. सुभाष गादिया यांच्यासह १२ ते १३ लोकांना अशा रिक्वेस्ट मिळाल्या.

फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर अखिलेश हातवळे यांच्यासोबत मराठीत चॅटींग करुन सायबर गुन्हेगाराने आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. आपण सध्या हॉस्पिटलमध्ये भरती असून आपल्याला तातडीने १२ हजार रुपयांची आवश्यकता आहे. हे पैसे लवकरच परत करणार असल्याचं या चॅटींगमध्ये सायबर गुन्हेगाराने अखिलेशला सांगितलं. पैसे जमा करण्यासाठी ‘गुगल पे’ आणि ‘पेटीएम’चे अकाऊंट नंबरही देण्यात आलेत. सदर प्रकार फसवणुसीचा असल्याचे लक्षात आल्याने कुणीच पैशांच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे यात कोणतेच आर्थिक व्यवहार झाले नाहीत. मॅसेज आलेल्या सर्वांनीच शनिवारी (ता. ५) सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सदर प्रकरणाची माहिती दिली. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या तक्रारीवर सायबर सेलने तपास सुरू केला आहे.

गुन्हेगारांचे धागेदोरे राजस्थानातील बाडमेरपर्यंत
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्वात आधी शासकीय निवासस्थान असलेल्या सिव्हील लाईन्स पोलिसांकडे केली. सिव्हील लाइन्स पोलीसांनी या प्रकरणाचा तपास अकोला पोलिसांच्या सायबर शाखेकडे सोपवला आहे. बनावट अकाऊंट तयार करणाऱ्या सायबर गुन्हेगाराने यासंदर्भात चॅटींग करताना ‘गुगल पे’ आणि ‘पेटीएम’चे अकाऊंट नंबर संबंधितांना दिले. यात ‘गुगल पे’साठी ९७२८९३७२४७ हा क्रमांक देण्यात आला आहे. तर ‘पेटीएम’ अकाऊंटसाठी ९१८०५९९३४४०६ हा क्रमांक देण्यात आला. परंतु पैसे मागण्यात आलेल्या व्यक्तींनी प्रसंगावधान दाखवले व पैसे दिले नाही. दरम्यान पोलिस तपासात सदर अकाउंट राजस्थानातील बाडमेर येथून संचालित करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

संपादन - विवेक मेतकर

Fake account of Akola District Collector demands money from Rajasthan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT