Fertilizer sakal
अकोला

Fertilizer Rate : शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार; खतांच्या किंमतींनी वाढविली चिंता

सरत्या खरीप व रब्बी हंगामात अस्मानी संकटांचा मार खाल्ल्यानंतर शेतकरी आर्थिक संकटात

सकाळ वृत्तसेवा

साखरखेर्डा - सरत्या खरीप व रब्बी हंगामात अस्मानी संकटांचा मार खाल्ल्यानंतर शेतकरी आर्थिक संकटात आहे. यंदा खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना अत्यावश्यक असणाऱ्या रासायनिक खतांच्या किंमतीत भाववाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असून शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार आहे.

कृषी केंद्र संचालक तथा डिलर यांच्याकडे खतांच्या साठा पूरेसा आहे. आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून, शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे.

शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर जवळपास अनिवार्यच झाला आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात रासायनिक खताच्या किंमती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच होत असल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडत असल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी चालू झाली. शिवाय बेसल डोस देणे आवश्यक असल्याने खताची मागणी ही वाढली आहे.

अशातच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. मिश्र खते, सुपर पोटॅशच्या भावातही मोठी वाढ झाली असून, डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या आंतरमशागतीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. ट्रॅक्टरने होणाऱ्या नांगरणीच्या खर्चात प्रति एकर ३०० रुपयांपर्यंत वाढ, खोल नांगरणीचा खर्च दोन हजार रुपये प्रति एकरवर पोहोचला आहे. इतरही खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली.

खतांच्या किंमतीत दीडपटीने वाढ

गत दोन वर्षांपूर्वीच खतांच्या किंमतीत सुमारे दीडपटीने वाढ करण्यात आली होती. आता आणखी २०० ते २५० पर्यंत खतांच्या किंमतीत वाढ झाली. मात्र शेतकऱ्यांच्या पिकविलेल्या शेतमालाच्या किंमती सातत्याने घसरत आहेत. ऐन खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर खतांच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

खतांच्या खरेदीसाठी लगबग

सिंदखेड राजा तालुक्यासह बुलडाणा जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच शेतकऱ्यांची रासायनिक खतांच्या खरेदीसाठी लगबग सुरू होते. कृषी केंद्रामध्ये शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. शेतकऱ्यांना खरिपाच्या हंगामात आवश्यक असणाऱ्या सुपर फॉस्फेट, मिश्र खते, पोटॅश आदी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठ्या वाढीच्या शक्यतेने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडणार आहे.

कमी वजनाच्या निविष्ठा, तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कृषी अधिकारी, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद, कृषी विकास अधिकारी बुलडाणा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा,

- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT