Flex Sakal
अकोला

श्वान मुद्द्यावरून कारंजात फ्लेक्स वॉर

न. प. मुख्याधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा

कारंजा (लाड) - कारंजा शहरात मोकाट कुत्र्यांचा (श्वान) मुबलक प्रमाणात संचार आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी मध्यंतरीच्या काळात थेट शहरवासींसह चिमुकल्या मुलांवर हल्लाबोल करुन त्यांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. याच कारणास्तव कारंजा नगर परिषदेने २० फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली. ही बाब वाखाणण्याजोगी असली तरी, यात कुत्र्यांना पकडतांना क्रूरता आढळून आल्याने वाशीम जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती सदस्य अक्षय लोटे यांनी न. प. कारंजा यांना रितसर निवेदन देऊन क्रूरता न करता मोकाट कुत्र्यांना पकडावे अशी, मागणी ५ मार्च रोजी केली. मात्र, या अजब निवेदनाची गजब दखल न. प. मुख्याधिकारी यांनी घेऊन हेकेखोर भावनेतून ''कुत्र्यांबाबत काही तक्रारी असल्यास प्राणीमित्र यांच्याशी संपर्क साधावा'' अशा, आशयाचे फ्लेक्स चक्क शहरातील चौकांमध्ये नावानिशी भ्रमणध्वनी क्रमांकासह लावल्याने कारंजा शहरातील सोशल मीडियावर फ्लेक्स वॉर पाहायला मिळत असून मुख्याधिकारी यांना नेमके साध्य करायचे काय? याबाबत तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर नोंदविल्या जात आहेत.

या फ्लेक्सवर एका तरुणीचा सुद्धा भ्रमणध्वनी क्रमांक आहे. एखाद्या असामाजिक तत्वाच्या व्यक्तीने या तरुणीच्या क्रमांकावर कॉल करुन अश्लाघ्य भाषेत संवाद साधल्यास याला जबाबदार कोण? शिवाय, चिडीमारी व खोडकरपणाला मुख्याधिकाऱ्यांचा पाठिंबा तर नाही ना? असा, सवाल सुद्धा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. ''हम करे सो कायदा'' ही भूमिका कारंजा मुख्याधिकारी यांनी बाजूला ठेऊन प्रशासकीय अधिकारी पदाची गरिमा कायम ठेऊन राजकारणाचा भाग न होता आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडावी. असे, सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चिल्या जात आहे. तर, वाशीम जिल्हा प्राणी क्लेष समिती सदस्य अक्षय लोटे यांचे व एका तरुणीचे नाव मुख्याधिकारी यांनी फ्लेक्सच्या माध्यमातून भ्रमणध्वनी क्रमांकसह सार्वजनिक केल्याने मानसिक त्रासासह अब्रू नुकसानीच्या दाव्याची रीतसर तक्रार ८ एप्रिल रोजी कारंजा पोलिस स्टेशनमध्ये देऊन मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया राबविली आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलिस स्टेशनचे पो.उप निरीक्षक खंडारे यांनी सदरची तक्रार नोंदवून प्रकरण तपासात ठेवले असल्याची माहिती प्राप्त आहे.

सिओ नाॅट रिचेबल

या संदर्भात कारंजा नगर परिषदचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन लागत नव्हता.

नगर परिषदेकडूनच शहराचे विद्रुपीकरण

कारंजा शहर स्वच्छ नि सुंदर राहावे ही नैतिक जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोडणाऱ्या नगर परिषदेची जबाबदारी असते, मात्र स्थानिक नगर पालिकाद्वारे जाहिरातीचे अनधिकृत रित्या लावलेले फलक काढण्याची मोहीम राबविल्या जात नाही. मात्र, जाहिरातीचे फलक लावून कारंजा शहराच्या विद्रूपीकरणात भरीसभर म्हणून कारंजा नगर पालिकेने सुद्धा आता फ्लेक्स लावणे सुरु केल्याने अनधिकृत फ्लेक्सधारकांना नगरपालिकेकडूनच एकप्रकारे पाठिंबा मिळत असल्याचे सदरहू प्रकणावरून दिसून पडत आहे.

कारंजा शहरात न.प.कडून निर्दयतेने व क्रूरतेने कुत्र्यांना मारण्यात आल्याबद्दल तक्रार नोंदवली असल्यामुळे संबंधित अधिकारी मला वेठीस धरत आहे. ज्यामध्ये, मी मोकाट कुत्रे पकडण्यासाठी विरोध करत आहे असे दर्शवल्या जात आहे. मात्र मी मोकाट कुत्रे पकडणे याला विरोध केला नसून चुकीच्या पद्धतीला विरोध केला आहे.

- अक्षय लोटे, प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती सदस्य.

फ्लेक्सवर जाहीररित्या नाव प्रकाशित करणे चुकीचे आहे. कुणाचे नाव असे जाहीररित्या प्रकाशित करण्याचा अधिकार नगरपरिषदेला आहे का? हे चुकीचे आहे

- आशीष गावंडे, सामाजिक कार्यकर्ता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT