Flood threat to 86 villages in Buldana 38 villages suffer damage due to dam burst Disaster Management Report sakal
अकोला

Buldhana : बुलडाणा जिल्ह्यातील ८६ गावांना पुराचा धोका; ३८ गावांमध्ये धरण फुटीमुळे होऊ शकते नुकसान, आपत्ती व्यवस्थापन अहवाल

अतिवृष्टीमुळे धरणांची पातळी वाढून जिल्ह्यातील धरणाखालील व धरणाजवळील गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. यात मोठ्या प्रमाणात जिवीत व मालमत्तेची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ वृत्तसेवा

-निलेश शहाकार

बुलडाणा : अतिवृष्टीमुळे धरणांची पातळी वाढून जिल्ह्यातील धरणाखालील व धरणाजवळील गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. यात मोठ्या प्रमाणात जिवीत व मालमत्तेची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन अहवाल तयार केला करण्यात आला आहे. त्यानुसार धरण फुटल्यास धोका उद्भवणाऱ्या धोकादायक ३८ गावात सतर्ग ठेवण्यात आली आहे. तर नदी नाल्यांना पूर येऊन धोका निर्माण होणारी ८६ गावे आहे.

पूरप्रवण क्षेत्रातील जवळपास २८६ गावांपैकी ८६ गावांना दरवर्षी पुराचा धोका जिल्ह्यात असतो. यामध्ये मेहकर तालुक्यातील १२, शेगाव दहा, नांदुरा २२, जळगाव जामोद ८ आणि संग्रामपूर तालुक्यातील पाच गावांचा प्राधान्याने समावेश आहे.

गतवर्षीच्या अतिवृष्टीदरम्यान यात काही नवीन गावांचाही समावेश झाला असण्याची शक्यता आहे. पैनगंगा, खडकपूर्णा, पूर्णा, नळगंगा धामना, आमना, विश्वगंगा, व्याघ्रा, ज्ञानगंगा, मस, मन, तोरणा, बोर्डी आणि वाण या प्रमुख १४ नद्या व त्यांच्या उपनद्यांचा प्रामुख्याने यात समावेश आहे. ३८ गाव धरणापासून संभाव्य धोका असणारी म्हणून निवडण्यात आली आहे.

संभाव्य धोका लक्षात घेत, या गावांमध्ये प्रशासनाकडून उपाययोजना केल्या आहेत. अडचणीच्या वेळी मदतीसाठी जिल्हास्तरावर ४० जणांची फौज तयार आहे. त्यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या भागातील गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन दिले जाते.

शिवाय धरणात बचाव व शोधकार्याचे प्रात्यक्षिक घेतले जातात. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर येतो. अशावेळी पाण्यातून व्यक्ती वाहून जाणे, पाण्यात घसरून पडणे, घराची भिंत पडून जखमी होणे अशी विविध संकट येतात. अशावेळी मदतीसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष २४ तास अलर्ट ठेवण्यात आला आहे.

तीन नद्यांचे होणार खोलीकरण

नद्यांमध्ये गाळ, राडारोडा पडून पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १४ मोठ्या नद्यांपैकी मन, तोरणा आणि पैनगंगा नदीपात्रांच्या १३० किमी लांबीचे खोलीकरण करण्याच्या दृष्टीने २७ जुलै रोजी मान्यता देण्यात आली. प्रारंभिक स्तरावरील सर्वेक्षणासाठी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नदीकाठावरील गावांना धोका

जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प सहा मध्यम प्रकल्प, ७६ लघु प्रकल्प आणि १७६ पाझर तलाव आहे.२६० एकूण प्रकल्प आहे. जिल्ह्यात खकडपूर्णा, पूर्णा आणि पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या गावांना नदिच्या पुराचा धोका असतो.अनेक वेळा ढगफुटीसारखा पाऊस एकाच गावात होत असल्याने नदी, नाले दुथडी भरुन वाहतात. तसेच गावांमध्येही पाणी शिरते. त्यामुळे पावसामुळे कोणत्या गावाला धोका आहे सध्याच सांगता येत नाही.

संभावित धोका असणारी गांव

कोराडीः नागझरी, पाचला,कावरखेड कल्याणा, मेहकर, मन धरणः कोराडी, शहापूर, खामगाव, नळगंगाः शेलापूर, दाताळा, उमापूर, निंबारी, कुंड, मलकापूर, ज्ञानगंगाः निमकवळा, तांदुळवाडी, वळती, खारखेड, अवधा बु. पलढगः तरोडा, जयपूर, कोथळी, खरबडी, शिवणी, अरमाळः बायगांव, मेंढगाव, वानः सगोडा, लाखनवाडा, वडगाव, वानखेड, पातुर्डा, पेनटाकळीः कळंमेश्र्वर, जानेफळ, बोथा -ढोरपगांव, काळेगाव, भालेगाव, येळगांवः येळगांव, सव, किन्होळा या गांवाचा समावेश आह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT