for lok sabha election msrtc 230 st booked voting admininstration Sakal
अकोला

Akola News : लोकसभा निवडणुकीसाठी २३० ‘लालपरीं’चे बुकिंग; मतदानासाठी प्रशासन सज्ज, तयारीला वेग

निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना सहा विधानसभा मतदारसंघात २५ एप्रिल रोजी नेऊन सोडणे व २६ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्‍यानंतर परत त्‍यांना त्‍यांच्‍या विधानसभा मतदारसंघात घेवून येण्‍यासाठी २३० बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना सहा विधानसभा मतदारसंघात २५ एप्रिल रोजी नेऊन सोडणे व २६ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्‍यानंतर परत त्‍यांना त्‍यांच्‍या विधानसभा मतदारसंघात घेवून येण्‍यासाठी २३० बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

त्यात १९८ बस व ३२ मिनी बसचा समावेश आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात ही प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघात म्हणजे २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे.

मतदानापूर्वी आवश्यक असलेली सर्वच तयारी अंतिम टप्प्यात असून ईव्हीएमवर मतपत्रिका सिलिंग करण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार ५६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

स्टाँगरूममध्ये ठेवलेले ईव्हीएम युनिट यादृच्छिकरण पद्धतीने वितरित करण्यात येणार आहे. कोणत्या मशीन कोणत्या मतदान केंद्रात पाठविण्यात येणार, हे अधिकाऱ्यांना मशीन पाठविताना समजणार आहे. दरम्यान मतदानापूर्वी प्रशासनाने सर्वच तयारी पूर्ण केली असून निवडणुकीच्या कामात व्यत्यय येऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. त्यानुसार ५३५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्थानिक स्तरावर बसची व्यवस्था

मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचणे सोपे व्‍हावे यासाठी ही निवडणूक विभागाने बसची व्यवस्था केली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

त्यात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर व रिसोड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. प्रत्येक मतदारसंघातून मतदान पथकांना घेवून जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. सदर बसेस व्‍यवस्‍था त्‍या-त्‍या ठिकाणी करण्‍यात आली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी मतदान पथके रवाना होणार असल्याने २५ एप्रिल व मतदान आटोपल्यानंतर २६ एप्रिल रोजी बस गाड्यांची महत्वाची भूमिका राहणार आहे.

प्रवाशांची होणार कोंडी

निवडणूक कामासाठी मतदान पथकतील कर्मचार व इतरांना साहित्य ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बससह इतर खासगी बसची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या एक दिवस आधी व निवडणुकीच्या दिवशी प्रवाशांची चांगलीच कोंडी होईल. वाहतुकीसाठी कमी साधन उपलब्‍ध राहणार असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसेल.

घरपोच मतदानासाठीही वाहने

आचारसंहिता पथके, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची पथके, सुक्ष्म निरीक्षकांची पथके आणि अन्य पथकांच्या सेवेत जीप, कार वापरल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे ८५ वर्षे वयोवरील ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वाहने देण्यात आली आहेत. त्यामुळे निवडणूक कामात वाहनांची संख्या वाढली आहे.

अशी आहे बसची वाहन व्यवस्था

  • बसेस ः १९८

  • मिनी बस ः ३२

  • झोन अधिकाऱ्यांसाठी ः ९३

  • भरारी पथक ः ५९

  • इतर आवश्यक जीप ः १५०

  • मोठे वाहन : तीन कंटेनर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT