Thackeray Group 
अकोला

Thackeray Group: विदर्भात राष्ट्रवादीला धक्का! नितीन देशमुखांनी माजी आमदाराला ठाकरे गटात आणलं

Sandip Kapde

Thackeray Group: अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे यांनी रविवारी मुंबई येथे मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेतला. भारिप बहुजन महासंघाकडून (आताची वंचित बहुजन आघाडी) अकोला पूर्व मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले हरिदास भदे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते.

मात्र, तेथे त्यांचे मन रमले नाही. गेले वर्षभरापासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. ते स्वगृही परतणार, अशी चर्चा सुरू असतानाच त्यांनी शिवबंध हातावर बांधून घेण्याचा निर्णय घेतला. गत महिन्यातच त्यांनी शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली होती. त्या बैठकीतील निर्णयानुसार रविवारी माजी आमदार भदे यांना शिवबंध बांधून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन देशमुख, अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची मातोश्रीवर उपस्थिती होती.  (akola news)

याशिवाय जिल्हा संघटक उमेश जाधव, उपजिल्हाप्रमुख विकास भाऊ पागृत, जिल्हा समन्वयक श्याम गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे, अप्पूदादा तिडके, जि.प. सदस्य गोपाल भटकर, संजय आढाऊ, प्रसाद देशमुख, उमेश उबाळे आदींची उपस्थिती होती.

माजी आमदार भदे यांच्यासोबत विविध सामाजिक संघटना व संस्थांच्या ७१ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश घेतला. यामध्ये प्रामुख्याने विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अध्यक्ष ॲड. श्रीराम सोनोने, माजी जि. प. सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनकरराव नागे, मराठा ब्रिगेडचे कोषाध्यक्ष योगेश बकाल, मूर्तिजापूर धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष अरविंद गाडवे,  प्रसिद्ध प्रमुख प्रा. लक्ष्मण सरोदे. (latest marathi news)

टाकोनकार समाज संघटनेचे पी.एच. डाबेराव, अनुसूचित जाती सेलचे अकोला शहर अध्यक्ष मिलिंद गवई, कुंभार समाज संघटनेचे दिलीप घाटोळे, भोई समाज संघटनेचे अध्यक्ष भानुदान नंदाणे व त्यांचे सहकारी, बेददार समजा संघटनेचे रहिश्चंद्र मेंगे व महादेव मेंगे, कोळी समाज संघटनेचे श्रीराम मोरे, ओबीसी संघर्ष समितीचे रमेश पाचपोर, धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष सुरेश मुकमाले आदीसंह ७१ जणांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT