अकोला : शहरात दररोज निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी कचरा घंटागाडी बरोबरच ३३ ट्रॅक्टर कामाला लावले आहेत. सोबतच पडीक वार्डात अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांवर खर्च होत असतानाही शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिग आढळून येत आहे. त्यामुळे स्वच्छता शहरात सुरू तरी कुठे आहे, असा प्रश्न पडत आहे.
कचरा संकलनासाठी शहरात १२५ घंटा गाड्या घरोघरी जातात. त्याच बरोबर नालीतील काढलेला कचरा, भाजी बाजारातील कचरा आणि रस्त्यालगत टाकण्यात येणारा कचरा उचलून डम्पिंग ग्राऊंडवर नेण्यासाठी महापालिकेच्या मालकीचे १६ ट्रॅक्टर आहेत. याशिवाय १७ भाडेतत्वावर ट्रॅक्टर घेतलेले आहेत. त्यांच्या इंधनासह मजुरांवर दररोज लाखोंचा खर्च करून संकलीत झालेला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो.
मात्र कचरा उचलण्याचे काम नियमितपणे होत नसल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेसह अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढिग लागले दिसून येत आहे. यात प्रामुख्याने फतेह चौक ते दीपक चौक, अलंकार मार्केट परिसर, सावित्रीबाई फुले भाजी बाजार (नवीन), किल्ला चौक ते भांडपुरा चौक आदी जागांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.