बुलडाणा : आयुष्य कधी कलाटणी घेईल आणि मनाशी असलेले स्वप्न साकारले जाईल हे सांगता येत नाही. असाच प्रसंग बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात येत असलेल्या करवड आणि मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे घडला आहे. बकरी ईदनिमित्त येथील एका बोकडाची किंमत लाखात नव्हे कोटीचा घरात आहे, दुसऱ्याची किंमत हजारात नव्हे तर दशलाखात गेली आहे. या बोकडांची किंमत इतकी कशी, असा सवाल प्रत्येकाच्या मनात येत आहे. याचे कारण म्हणजे त्यांचा बांधा आणि त्यावर असलेल्या खुणा होय. या बोकडांचे नाव आहे टायगर आणि खंड्या... (Goat-Eid-Goats-cost-millions-social-media-Statewide-discussion-nad86)
चिखली तालुक्यातील करवंड गावातील हे बोकड आहेत. या बोकडांची सद्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. टायगरला पाहण्यासाठी आठवडाभरापासून ग्रामस्थच नव्हे तर जिल्ह्यातील नागरिक गर्दी करीत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील करवंड गावचा उंच पुरा गडी. मोठं कपाळ. मजबूत बांधा. जणू काही रोजच जिममध्ये जातो! ताकदीने एवढा मजबूत की दोन तीन जण फक्त त्याला पकडण्यासाठी लागतात.
या टायगवर लाखोंची बोली लागण्याचे कारण वेगळे आहे. ते म्हणजे त्याच्या पाठीवर जन्मतः अल्लाह उमटलेले आहे. जसजसे लोकांना याबद्दल माहिती होऊ लागली तसतशी याची किंमत लाखोंच्या घरात पोहोचली आहे. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ५१ लाखांपर्यंत याची मागणी गेली आहे. परंतु, आपल्या बोकडाला जवळपास एक कोटीपर्यंत किंमत मिळावी अशी अपेक्षा मालकाची आहे. हा टायगर आता नेमका कितीची मजल गाठतो हेच पाहणे बाकी आहे.
दुसरीकडे खंड्या आहे. खंड्या हा मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील आहे. खंड्या मजबूत असून, त्याची खुराक मोठी आहे. दररोज ढेप, केळी, भाजीपाला असे दोन वर्षांपासून त्याला खायला दिले जात आहे. खंड्यालाही पाहण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातील असंख्य लोक व व्यापारी येत आहेत. जिल्ह्यातील बाजारपेठेत खेड्याला विकायला नेले असता लाखोंमध्ये बोली लागते.
त्याला १० लाखांपर्यंत बोली लागली आहे. त्याचे कारण म्हणजे खंड्याच्या कपाळावर चंद्रकोर आहे. त्यामुळे बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी मागणी वाढली असली तरी, किंमत आल्याशिवाय देणार नसल्याचे मालक सांगतात. बकरी ईदला हे दोन बोकड किती रुपयाला विकले जातात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
(Goat-Eid-Goats-cost-millions-social-media-Statewide-discussion-nad86)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.