अकोला : वंचित बहुजन आघाडीची सत्ता असलेली जिल्हा परिषद या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कुठलाही वचक सत्ताधाऱ्यांचा नसल्याने बेताल कारभार पहायला मिळत आहे. यात एका ग्रामसेविकेने चक्क उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली. हे प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी व जिल्हा परिषद अध्यक्षा संगिता अढावू यांच्या दालनात पोहोचल्यानंतरही दोन्ही महिलांनी आपल्याला ठीक आहे असे म्हणून दाद दिली नसल्याची खंत तक्रारकर्त्या महिलेने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
सविस्तर असे की, अकोला जिल्हा परिषदेत कार्यरत उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा अकोटचे गटविकास अधिकारी कालीदास रघुनाथ तापी व अकोल्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी व सध्या कार्यरत असलेले लिंबाजी बारगीरे (गटविकास अधिकारी रा. कळमपुरी, जि. हिंगोली) यांच्यावर एका ग्रामसेविकेने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांनी माझ्या कामाच्या ठिकाणी लैंगीक छळ केला असून व माझे जगणे खुप लाजीरवाने केलेले आहे असे म्हटले असून दोन्ही अधिकाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करून कामाच्या ठिकाणी माझा होणारा लैगीक छळ थांबवावा व त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सदर ग्रामसेवक महिलेने केली आहे.
विशाखा समिती करणार चौकशी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्याकडे ग्रामसेवक महिलेने धाव घेत आपबिती सांगितली. यावेळी जिल्हा परिषेदचे माजी पदाधिकारी राजीव बोचे उपस्थित होते. घटनेतील एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असून तापी यांच्यावर अद्याप पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. पोलिस त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आपण चौकशी करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी तापी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामसेविकेने केली. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी हे प्रकरण विशाखा समितीकडे सोपवले असून चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
माझ्या जिवीतास धोकाः कालिदास तापी
आज १९ जुन रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजता चे दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, अकोला मनोज जाधव यांच्यासोबत कार्यालयातील कामाविषयक चर्चा करीत असतांना त्या ठिकाणी सदर ग्रामसेविका तीन इसमांना घेवुन आल्या. तिथे आल्यावर त्यांनी माझा हात पकडुन मला मारण्याचा प्रयत्न केला. मी गट विकास अधिकारी, पंचायत समिती अकोला या पदावर कार्यरत असतांना ग्रामसेविकेबाबत सेवा विषयक अनेक तक्रारी कार्यालयास प्राप्त होत्या. त्यांनी ग्राम चिखलगांव येथे कार्यरत असतांना अफरातफर केल्याने त्यांना प्रशासनाने निलंबीत केले होते. त्यांची खाते चौकशी अंतीम टप्यात असून यात माझी सरकारी साक्षीदार म्हणुन २६ जूनरोजी साक्ष आहे. सद्यस्थीतीत माझ्याकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जिल्हा परिषद, अकोला व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) या दोन्ही पदाचा अतिरिक्त प्रभार असल्याने त्यांनी कार्यवाहीच्या भितीने माझेवर दबाव आणत आहेत. त्यांनी यापुर्वीसुध्दा माझे विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर महिला व तीचे साथीदारापासून माझ्या जिवितास धोका आहे. यासंदर्भात मी सिटी कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिस संरक्षण मागितले आहे.
- के.आर.तापी, गट विकास अधिकारी तथा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य/पंचायत) जि.प.अकोला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.