hartalika teej 2023 puja muhurat ganesh chaturthi culture akola market  sakal
अकोला

Hartalika Teej 2023 : आज हरतालिका, उद्या बाप्पाचे आगमण; बाजारपेठेत उत्साह; अकोल्यात सजली मूर्तीची दुकाने

‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत मंगळवारी (ता.१९) घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होणार

सकाळ वृत्तसेवा

अकोला : ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत मंगळवारी (ता.१९) घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून, खरेदीसाठी शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलली आहे. त्यापूर्वी सोमवारी (ता.१८)घरोघरी महिलांकडून हरतालिकेचे व्रत ठेवून पूजा केली जाणार आहे. त्यासाठी रविवार दिवसभर बाजारात हरतालिकेसाठी आवश्‍यक साहित्या खरेदीची लगबग दिसून आली.

गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी जिल्ह्यात सुरू असून, विविध भागात मूर्तीची विक्री करणारे शेकडो स्टॉल लागले आहेत. विविध सार्वजानिक मंडळात मंडप आणि सजावट केली जात असून, त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे.

गणेश मूर्तीचा मुख्य बाजार अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आहे. याशिवाय जठारपेठ चौक, गौरक्षण रोड, सिंधी कॅम्प, जयहिंद चाैकासह मुख्य बाजारपेठेत व शहरातील विविध भागात गणपतीच्या मूर्तींची दुकाने थाटली आहे.

हरतालिका आणि त्यापाठोपाठ गणेशाच्या स्थापनेसाठी पूजेच्या तयारीला लागणारे साहित्य, तसेच मूर्ती खरेदीसाठी सर्व बाजारपेठा रविवारी गर्दीने फुलल्या होत्या. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवड्याची पानं, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना आज चांगली मागणी होती.

प्रसादासाठी पेढे, मोदक यांचीही खरेदी सुरू झाली असून, प्रसाद साहित्याचीही मोठी उलाढाल बाजारात सुरू आहे. गणरायांच्या आगमनाची लगबग आज घरोघरी सुरू आहे.

श्री गणेश चतुर्थीला पुजावयाची मूर्ती कशी असावी?

चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी, तसेच पर्यावरणाला घातक आहे. मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी. मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली, पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची अन् नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी.

अशी करा मूर्ती स्थापन

पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची असते, त्यावर तांदूळ (धान्य) ठेवून त्यावर मूर्ती ठेवतात. आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदुळाचा लहानसा ढीग करतात. मूर्तीत गणपतीचे आवाहन करून तिची पूजा केल्याने मूर्तीत शक्ती निर्माण होते. त्या शक्तीमुळे तांदूळ भारित होतात. त्याचप्रमाणे मूर्तीखालील तांदुळात शक्तीमुळे स्पंदने निर्माण झाली की, घरातील तांदुळाच्या साठ्यातही शक्तीची स्पंदने निर्माण होतात.

हे ठेवा लक्षात!

- श्री गणेश चतुर्थीसाठी पुजावयाची मूर्ती शक्यतो आदल्या दिवशीच आणून ठेवावी.

- श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुुरुषाने इतरांसह जावे.

- सजवलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर मूर्ती ठेवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT