Khambgaon Crop Damage : sakal
अकोला

Khambgaon Crop Damage : अतिपावसाचा फळबागांसह पिकांना फटका,शेतकरी आर्थिक संकटात : पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

Khambgaon Crop Damage : खामगावातील बोरी अडगाव परिसरात जोरदार पावसामुळे कपाशी, सोयाबीन आणि पपईसारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

खामगाव : तालुक्यातील बोरी अडगाव परिसरात यावर्षी जोरदार पावसाचा कपाशी, सोयाबीनसह फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. पपईचे पीक खराब झाले असून पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान शासनाने नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. जिल्ह्यात सिंचन प्रकल्प व विहिरींमध्ये जलसाठा असल्याने अनेक शेतकरी सिंचनाकडे वळले व शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून संत्रा व केळी पपईच्या बागा फुलविल्या. मात्र, यावर्षी जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव शिवारात अनेक शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली होती. तर यावर्षी सोयाबीन, कपाशी सह सर्वच पिके चांगल्या अवस्थेत होती.

मात्र मागील काही दिवसात परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतातील पपईची झाडे उन्मळून पडली आहेत. सोबतच केळी, संत्रा या पिकांसह खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

मी दोन हेक्टर शेतात पपईची लागवड केली होती. याकरिता ६ लाख रुपये खर्च आला. मात्र गत काही दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे पपईची झाडे सडत आहेत. त्यामुळे नुकसान होत आहे. कृषी विभागाने सर्वेक्षण करून मदत देण्याची गरज आहे.

- शेख मुमताज, शेतकरी बोरी अडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT