Matola Crop Damage sakal
अकोला

Crop Damage : अतिवृष्टीने घातला शेतकऱ्यांच्या मुळावर घाव....शेतातील पिकात व घरात पाणी

Crop Damage : अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शेतातील पिकांमध्ये पाणी साचले असून, शासनाच्या मदतीची गरज भासते आहे.

सकाळ वृत्तसेवा

मोताळा : तालुक्यात गेल्या आठवडा भरापासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडलेल्या अवस्थेत शेतकरी शासनाच्या मदतीच्या हाताकडे आस लावून बसला आहे. यात रविवारी १३ ऑक्टोबरच्या रात्री पावसाने पुन्हा तालुक्याला झोडपून काढले.

नदी नाल्यांना प्रचंड पूर आल्यानंतर नळगंगा प्रकल्पाची ११ दरवाजे उघडण्यात आली. पाण्याच्या प्रचंड विसर्गाने नदीकाठच्या नागरिकांची तारांबळ उडाली. शेतात पाणी साचल्याने ऐन तोंडाशी आलेला घास परतीच्या अतिवृष्टीने हिरावून घेतला.

गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाने मोताळा तालुक्यात हाहाकार माजविला आहे. आता शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात न दिल्यास शेतकऱ्यांची उमेद खचणार हे निश्चित. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.

पिकेही जोमात होती. मात्र कापूस वेचानीस आला, त्यावेळी सोयाबीन सोंगणीही सुरू आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर न मिळाल्याने हजारो क्विंटल कापूस झाडावरच आहे. त्यातच सततच्या पावसाने कापसाला झाडावरच कोंब येत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणी केली व परतीचा पाऊस धडकला त्यामुळे सोयाबीनच्या सुड्या झाकून ठेवल्या. तुफान वारा व पावसाने सोयाबीन पिकाची दाणादाण झाली. सुड्यांवरील कागद उडाल्याने त्यात पाणी शिरले व प्रचंड नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन सोंगणी बाकी आहे. ते संपूर्ण पीक पाण्यात आहे. मका पीक सोसाट्याच्या वाऱ्याने जमीनदोस्त झाले आहे. त्याला सुद्धा कोंब येत आहेत.

अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या, बांध फुटल्याने शेती खरडून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खचलेल्या विहिरी, घरांची पडझड, शेतकऱ्यांचे ठिबक, पाइप यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून पिकांचे सरसकट नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

सात तालुक्यात अतिवृष्टी

बुलडाणा तालुक्यातील धाड, पाडळी, म्हसला, देउळगाव राजा तालुक्यातील देउळगाव ग्रामीण, तुळजापूर, सिंदखेड राजामधील सिंदखेड राजा, मोताळा तालुक्यातील मोताळा, बोराखेडी, धामणगाव बढे, पिंप्री, रोहीणखेड, पिंपळगाव आणि शेलापूर, जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव, जामोद, वडशिंगी, पिंपळगाव काळे, आसलगाव, संग्रामपूर तालुक्यातील कवठळ, शेगाव तालुक्यातील शेगाव आणि मनसगाव, मलकापूर तालुक्यातील दाताळा, नरवेल, जांभुळ या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

सोयाबीन सोंगणी सुरू असतानाच पाऊस सुरू झाला त्यामुळे ते पाण्यात भीजले आहे. रोजच पाऊस सुरू असल्याने एक दानाही घरात येणार नाही अशी परिस्थिती.

- अभिषेक जोहरी, युवा शेतकरी, कोथळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT