Radheshyam Chandak Sakal
अकोला

इतिहास जिवंत राहिला तर भविष्यात तो निर्माण करू शकतो; राधेश्याम चांडक

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे व राजवाड्याचे कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यासाठी पथक आले होते.

गजानन काळुसे

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे व राजवाड्याचे कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यासाठी पथक आले होते.

सिंदखेडराजा - ऐतिहासिक स्थळांची (Historical Place) जपवणूक म्हणजे आजच्या गतकालीन शौर्याची जपवणूक. जर इतिहास काळाच्या उदरात गडद झाला तर माणूस इतिहास निर्माण करू शकत नाही. त्यामुळे इतिहास जिवंत राहायला तर माणूस भविष्यात (Future) इतिहास निर्माण करू शकतो, त्यासाठी प्रेरणा देणारी ऐतिहासिक स्थळांची जपवणूक आणि संवर्धन आवश्यक असल्याचे प्रतिपादन बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांनी केले.

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे व राजवाड्याचे कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यासाठी पथक आले होते. या पथकामध्ये पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालिका जया वाहने, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यांतील ऐतिहासिक वास्तूवर कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्यामुळे प्रशासनाकडून स्वखर्चातून ऐतिहासिक वास्तूवर रोषणाई व इतर गोष्टीसाठी सामाजिक संस्थांना आव्हान करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी यांनी बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्यासोबत चर्चा करून पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. बुलडाणा अर्बनने सामाजिक दायित्व जपण्यासाठी पुढाकार घेतला असून, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय मुंबई यांच्याकडून राज्य संरक्षित स्मारकाची देखभाल व स्वच्छता, 2 पहारेकरी 2 गाइड तसेच स्वच्छतागृह व पिण्याचे पाण्याचे व्यवस्थेसाठी मान्यता देण्यात आली आहे. परवानगी मिळाल्यामुळे बुलडाणा अर्बन व प्रशासनाचा करारनामा करण्यात आला. यावेळी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्म स्थळाची व राजवाड्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी, बुलडाणा अर्बन परिवाराच्या माध्यमातून रोषणाई करण्यात येणार आहे.

बुलडाणा अर्बन मर्यादित न राहता संपूर्ण सिंदखेडराजातील ऐतिहासिक स्थळांच्या पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. अ‍ॅड.नाझेर काझी यांचा राधेश्याम चांडक यांनी कृतज्ञपूर्वक उल्लेख केला. कोणती गोष्ट पाठपुरावा शिवाय शक्य नसते अ‍ॅड. नाझेर काझी यांच्या कल्पकतेतून ते नेहमी ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात पाठपुरावा करतात त्या पाठपुरवाचे फळीत राजवाड्यावर कायमस्वरूपी रोषणाईचा निर्णय बुलडाणा अर्बन परिवाराने घेतला आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या इतिहासाचे लेखन करण्याची जबाबदारी कवी अजीम नवाज राही यांना देण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, नगराध्यक्ष सतीश तायडे, उपनगराध्यक्ष विजय तायडे, तहसीलदार सुनील सावंत, विवेक जगताप, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, माजी सभापती जगन सहाने, राजू आप्पा बोंद्रे, संदीप मेहेत्रे, बुद्धू चौधरी, संजय मेहेत्रे, यासीन शेख, विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमाने, शाखा व्यवस्थापक उदय कुलकर्णी, अरविंद गिरी, अनंता देशपांडे पुरातत्त्व विभागाचे सांगळे,निकेश कुंभाळकर यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

राधेश्याम चांडक यांची पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा

बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सोबत चर्चा केली.सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक वास्तूच्या संदर्भामध्ये चर्चा केल्यानंतर पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासकीय पातळीवर बुलडाणा अर्बन परिवाराला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे भविष्यामध्ये ऐतिहासिक वास्तूची जतन आणि संवर्धन होण्यासाठी मदत होणार आहे.

दैनिक सकाळ च्या पाठपुराव्याला मोठे यश

राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आणि राजवाड्याच्या विकासाबाबत सातत्याने लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे कार्य दैनिक सकाळ वृत्तपत्रातून करण्यात आले आहे. खा.सुप्रियाताई सुळे यांचा दौरा, निधीची कमतरता आणि विकास आराखड्याचे प्रारूप यावर प्रकाश टाकण्यात आल्यामुळे त्या पाठपुराव्याला आता गती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT