१ जूननंतरही लॉकडाउनमधून सुटका अशक्य beed lockdown
अकोला

रेड झोन; १ जूननंतरही लॉकडाउनमधून सुटका अशक्य

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येनुसार अकोला जिल्हा अद्यापही रेड झोनमध्येच असल्याने ता. १ जूननंतरही लॉकडाउनमधून अकोला जिल्ह्याची सुटकका अशक्य आहे. मात्र, रुग्ण संख्या कमी होत असल्याने लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता दिली जाऊ शकते. (In Akola Red Zone, escape from lockdown is impossible)


राज्यातील लाॅकडाऊनमधे शिथिलता देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. रेडझोन असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्हे रेडझोनमध्ये समाविष्ट आहे.

कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असल्याने १ जूननंतर काही जिल्ह्यामध्ये लॉकडाउन शिथिल होणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी जाहीर केले. त्यानुसार रेडझोन असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अकोला जिल्ह्यासह अमरावती विभागातील यवतमाळ, अमरावती, बुलडाणा आणि वाशीम या पाचही जिल्ह्यांचा समावेश आहे.

रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यात लॉकडाउन ता.१ जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. मात्र, अकोला अद्यापही रेड झोनमध्ये कायम असल्याने लॉकडाउनचा विळखा पुन्हा १५ दिवसांसाठी कायम राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी या आठवड्यात जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी झाल्यास सध्या असलेल्या लॉकडाउनच्या नियमात आणखी शिथिलता दिली जाण्याची शक्यता आहे.

संपादन - विवेक मेतकर

In Akola Red Zone, escape from lockdown is impossible

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT