वाडेगाव - एका एकरात केळी व पपई पिकाचे वीस हजार खर्च करून तब्बल साडेआठ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न घेतले, असून या शेतकऱ्याने केलेले नानाविध यशस्वी प्रयोग इतर शेतकरी बांधवांना प्रेरणादायी ठरत आहेत.(Motivational Story in Marathi)
पातूर तालुक्यातील दिग्रस (बु.) येथील १९९९ सालापासून प्रमाणित पद्धतीने सेंद्रिय शेती करणारे, तसेच वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी सन्मानाने पुरस्कृत स्वामीनाथन फाउंडेशनची फेलोशिप मिळालेले शेतकरी राजेंद्र महादेव ताले यांनी शेतातील पूर्वीच्या केळीच्या झाडापासून टिशू बनवण्यासाठी काही संस्थांना विचारले असता, त्यांना नकार मिळाला. मग शेतातच अभिवृत्ति पद्धतीने शेतातच असलेल्या केळीच्या जातीच्या दोन हजार रोपे तयार केले, त्या झाडांना पावर टिलरने भरी घातली.
झाडांच्या वाढीसाठी त्यांना वेळोवेळी जिवामृत, गोकृपा अमृत, कोंबडी खत, कंपोस्ट खत दिले. ४×५ फूट या अंतरामध्ये एक हजार ८०० केळीच्या रोपांची लागवड केली. एका घडामध्ये साधारणतः सात ते नऊ फण्या घेतल्या, तर १२-१५ डझन केळी मिळते. त्या केळीची ५० रुपये डझन प्रमाणे विक्री केली; तर ५०० ते ७०० रुपये झाडाप्रमाणे नऊ लाख ते १२ लाख ६० हजार व असा गणिती हिशोब केला, तर ढोबळमानाने आठ लाख ३५ हजार रुपये मिळाले. त्यातच गावरान पपईची २०० झाडे लावली होती. त्यापासून ८० हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले.
या सर्व केळी व पपईची स्वतः विक्री केली. त्यानंतर फार्मर कट्टा, गोकुळा देशमुख, गणेश मोकळकर, कवळे इत्यादी व्यापाऱ्यांच्यामार्फत विक्री केल्यामुळे राजेंद्र ताले यांनी आपल्या शेतात कमी क्षेत्रात, कमी खर्चात घेतलेले केळी, तसेच पपईचे उत्पादन निश्चितच इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे, तसेच शेतकरी बांधवांकडून घेतले जात असलेल्या पारंपरिक पिकांचा उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत आहे, त्यामुळे शेतकरीऱ्यांनी पारंपरिक पिकासोबतच नवनवीन प्रयोग तंत्रज्ञान वापरून शेती पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे.
- राजेंद्र ताले, प्रगतीशील शेतकरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.