अकोला : परिस्थिती कशीही असली अन् मनात काही करण्याची जिद्द असेल तर यशाला गवसणी घालता येतेच हे दाखवून दिले आहे शेळद येथील ॲड. प्रदीप अवचार व ॲड. मुक्ता प्रदीप अवचार या पती-पत्नीने.
दिव्यांग आई व वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून मुलगा प्रदीप याने प्रतिकूलतेवर मात करत एमपीएससीची सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ ही परीक्षा उत्तीर्ण केली. इतकेच नव्हे तर ॲड. प्रदीप अवचार यांची पत्नी ॲड. मुक्ता अवचार ने सुद्धा पतीसोबतच परीक्षा उत्तीर्ण करत माहेरच्यांसह सासरच्यांचे नाव उज्ज्वल केले आहे.
बाळापूर तालुक्यातील शेळद येथील पती ॲड. प्रदीप अवचार व पत्नी ॲड. मुक्ता प्रदीप अवचार या दोघांनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट-अ ही परीक्षा उत्तीर्ण केली.
घरच्या अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करीत आपला अभ्यास पूर्ण करून त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. प्रदीप अवचार यांचे आई-वडील दिव्यांग आहेत. त्यांच्याकडे कुठलीही जमीन जुमला, शेती, मालमत्ता नाही.
दिव्यांग असताना बाळापूर सारख्या ठिकाणी टेलरिंग काम करून त्यांनी तीनचाकी सायकलवर प्रवास करीत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह केला. प्रचंड कष्ट करत मुलांचे शिक्षण केले. प्रदीप अवचार सर्वात मोठा मुलगा शिक्षण करत असताना कष्टाचे काम सुद्धा करू लागला, तरी शिक्षणाची जिद्द पूर्ण ठेवून वकीलीचे शिक्षण घेतले व परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याच्या शिक्षणाकरिता त्याचा लहान भाऊ यांने सुद्धा अनेक वेळा प्रदीपला मदत केली व सर्वांनी त्याला सहकार्य केले.
त्याचप्रमाणे त्याची पत्नी सौ. मुक्ता ही सुद्धा प्रदीप सोबत परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. केवळ मेहनत, सातत्य व अभ्यासाच्या जोरावर दोघेही पती-पत्नी क्लास वन अधिकारी या पदापर्यंत पोहोचले आहेत. यामुळे त्यांच्या परिवाराला खूप मोठा आधार झाला असून अवचार कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.(Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.