Akola News Sakal
अकोला

Akola News : अकोला विभागात बदलीबाबत अनियमित; विशिष्ट कर्मचाऱ्यांना सोईनुसार पदस्थापना

राज्प परिवहन महामंडळाकडे तक्रार

योगेश फरपट

अकोला : अकोला व वाशीम जिल्हयासाठी असलेल्या राज्य परिवहन अकोला कार्यालयामार्फत विभाग नियंत्रकांनी केलेल्या बदल्यात गैरप्रकार केल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे. यामध्ये काही विशिष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत त्यांना सोईनुसार पदस्थापना दिल्याची तक्रार राज्य परिवहन महामंडळाकडे झाली आहे.

प्रशासकीय कारणास्तव १३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या १ जानेवारी २०२४ रोजी केल्या होत्या. यामध्ये विद्या सरसे, रुपाली गोखले, रुपम वाघमारे, उदय गंगाखेडकर, गणेश डांगे, धीरज तांदळे, सुप्रिया चव्हाण, अनुप तडसे, अर्चना भीसे, अमोल राऊत, प्रशांत राठोड, राजेश मिश्रा यांचा समावेश होता. यापैकी गणेश डांगे सोडून इतर १२ कर्मचाऱ्यांनी आदेशाचे पालन करीत बदली झालेल्या ठिकाणी रूजू झाले. मात्र गणेश डांगे हे १ जानेवारी २०२४ पासून डयुटीवर हजर झाले नाही. व प्रशासनावर राजकीय व प्रशासकीय व संघटनात्मक दबाव टाकून ९ जुलै २०२४ रोजी त्यांची १ जानेवारीला झालेली बदली रद्द करून घेतली. यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून यामध्ये आर्थीक देवाणघेवाण झाल्याचा आरोप होत आहे.

दुसऱ्यांदा बदली रद्द

लिपीक गणेश डांगे यांची यापूर्वी सन २०१६ मध्ये सुध्दा अकोला येथील विभागीय कार्यालयातील इतर शाखेत सांखिकी विभागात बदली झाली होती. त्यावेळी सुद्धा गणेश डांगे यांनी दबावतंत्र वापरून रद्द करून घेतली होती. तेव्हा सुद्धा काही कर्मचाऱ्यांची या प्रकाराची तक्रार केली होती. आणि याहीवेळेस त्यांची बदली दुसऱ्यांदा रद्द झाली आहे. सुरुवातीपासून ते लेखाविभागातच कार्यरत असून तेथे अकोला व वाशीम जिल्हयातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आणि सेवानिवृत्तीचे प्रकरणे यासारख्या आर्थीक प्रकरणे निकाली काढली जातात. त्यामुळे त्यांचा इंटरेस्ट याच विभागात जास्त असल्याची चर्चा आहे.

यासंदर्भात यापूर्वी सुद्धा दोन ते तीन वेळा महामंडळाकडे मुंबई वरिष्ठ कार्यालयाला लेखी निवेदन देवून अकोला येथील विभाग नियंत्रक श्रीमती शुभांगी शिरसाठ यांनी व प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून लेखा शाखेतील झालेली बदली रद्‍द करतील असे भविष्य वतर्तवतले होते. लेखा शाखेमध्ये स्थानिक खरेदी विक्री वैद्यकीय बिले काढणे, अर्जित रजेचे आदेश पारित करणे असे आर्थीक व्यवहार गणेश डांगे करीत असल्याने प्रशासनातील अधिकारी त्यांची बदली रद्द करतील असा अंदाज व्यक्त करून लेखी तक्रारी केल्या होत्या. त्या आजरोजी खऱ्या ठरल्या आहेत. याबदलीमुळे एकूण १३ प्रशासकीय कामगारांवर अन्याय झाल्याचे दिसून येते. प्रभाकर गोपनारायण, सेवानिवृत्त आस्थापना पयज्ञयवेक्षक तथा विधी सल्लागार कास्ट्राईब कर्मचारी परिवहन संघटना अमरावती प्रदेश.

कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसारच केल्या आहेत. कुठेही अनियमितता झाली नाही. गणेश डांगे यांची बदली नियमानुसारच रद्द केली आहे.

- शुभांगी शिरसाठ, विभाग नियंत्रक, अकोला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT