sakal
अकोला

जळगाव: सरकार, विमा कंपनीने शेतकऱ्यांचा फुटबॉल केला

शासन आणि पीक विमा कंपनी शेतकऱ्यांचा फुटबॉल करीत असून, पीक विम्‍याची रक्‍कम शेतकऱ्याचे खात्यात पडल्याशिवाय मंत्रालयातून उठणार नसल्‍याचा इशारा आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जळगाव: शासन आणि पीक विमा कंपनी शेतकऱ्यांचा फुटबॉल करीत असून, पीक विम्‍याची रक्‍कम शेतकऱ्याचे खात्यात पडल्याशिवाय मंत्रालयातून उठणार नसल्‍याचा इशारा आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिला आहे.

गेल्या सात ते आठ महिन्यापासून मतदारसंघातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे ६५ लाख रुपये देण्यास विमा कंपनी आणि महाराष्ट्र शासन टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ (ता.१६) जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय कुटे आणि त्यांच्या समर्थक शेतकऱ्यांनी मंत्रालयात सायंकाळी आंदोलनाला सुरुवात केली. तत्पुर्वी त्यांनी कृषी मंत्री, कृषी सचिव विविध अधिकारी आणि विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली परंतु, चर्चेअंती काही निष्पन्न न झाल्याने अखेर मंत्रालयात आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

सोयाबीन पीकाचा पीक विमा जळगाव जामोद मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे निषेधार्थ वारंवार निवेदने देऊन, आंदोलन करून सुद्धा काही उपयोग न झाल्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे आणि काही ठरावीक शेतकऱ्यांनी आज रिलायन्स कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन आपली भूमिका रिलायन्सच्या अधिकाऱ्यांपुढे स्पष्ट आणि प्रखरपणे मांडली.

त्यावर त्यांनी ठोस निर्णय न घेतल्याने अखेर आमदार डॉ. संजय कुटे आणि सहकारी शेतकऱ्यांनी मंत्रालयात ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला आणि जोपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अदा होणार नाही, तोपर्यंत आपण येथून हलणार नाही, असा इशारा दिला.

कंपनीला सातशे कोटीपेक्षा अधिक रुपये मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी का टाळाटाळ होत आहे? विमा कंपनीला ५०० कोटी रुपये नफा झाला आहे. शासन शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे पाठविते आणि विमा कंपनी शासनाकडे बोट दाखविते. शासन आणि विमा कंपनी या दोघांच्या भांडणात शेतकऱ्यांचा मात्र फुटबॉल झाला आहे, अशी व्यथा आमदार कुटे यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर अग्रवाल, बंडू पाटील, संतोष देशमुख, राजेंद्र ठाकरे, जानाराव देशमुख, गजानन सरोदे, लोकेश राठी, प्रकाश पाटील, शिव ठाकरे, सचिन देशमुख, निलेश शर्मा, भारत वाघ, रामदास म्हसाळ, अशोक मुरुख, प्रकाश राऊत, सुधाकर शेजोळे, शोएब उपस्थित होते. शेतकऱ्यांची परिस्थिती फार हलाखीची असून शासनाने सुद्धा शेतकऱ्यांना कसलीही आर्थिक मदत दिली नाही.

त्यामुळे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या या आंदोलनाकडे मतदारसंघातील शेतकरी सकारात्मक दृष्टीने बघत असून आता पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास या परिसरातील जनतेने व्यक्त केला आहे.

"माझे माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांशी ऋणानुबंध आहेत. ज्यांनी मला इथे प्रतिनिधी म्हणून पाठवले त्यांना पीकविमा मिळवून देणे हे माझं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आणि आमचा संयम न बघता पीक विमा कंपन्यांनी आमच्या मतदारसंघापुरता निर्णय घेऊन पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावी."- डॉ. संजय कुटे, आमदार जळगाव जामोद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

Latest Maharashtra News Updates : मतदारांवर प्रभाव टाकणारा राजकीय प्रचार केल्यास होणार कारवाई

SCROLL FOR NEXT