jalgaon jamod police action dj police permission needed for dj sakal
अकोला

Buldhana News : जळगाव जामोद पोलिसांनी केली डी जे वर कार्यवाही

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर(बुलढाणा) - लग्न समारंभाच्या अनुषंगाने काढण्यात येणाऱ्या वरात मिरवणुकी करीता पोलीस परवानगी घेवुनच वरात मिरवणुक काढली जावी. अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील . असे फर्मान खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घाटाखालील सहा तालुक्यातील पोलीस स्टेशन ला दिले आहेत.

30 एप्रिल रोजी जळगांव जामोद शहरात रात्री DJ वाहन क्र. MH04 DS 8968 मध्ये मूळ स्वरूपात बदल करून DJ बनविण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सदर वाहनास पो.स्टे. ला डिटेन करण्यात आले होते,

सदर वाहनाची आज रोजी RTO च्या अधिकाऱ्यांना पाचारण करून तपासणी केली असता त्यांनी ₹ 33,500/- ची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, सदर वाहन पूर्ववत दुरुस्त करून दोन दिवसात RTO बुलढाणा कार्यालयात नेऊन पुन्हा नोंदणी करण्यासाठी RTO च्या सूचनेनुसार सोडण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने सो., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात सो., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देवराम गवळी सो. यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जामोद पो.स्टे. चे पो.नि. आनंद महान, पो.उ.नि. सरक पो.उ.नि. पंडित,

पो.ह. शेगोकार, पो.शि. राजपूत तसेच RTO चे मोटार वाहन निरीक्षक भंडारे साहेब यांनी केली. पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये काढण्यात येणाऱ्या लग्नाच्या वरात मिरवणुकीमध्ये वाद होवुन कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसुन येत आहे.

लग्न संमारंभाच्या अनुषंगाने काढण्यात येणाऱ्या वरात मिरवणुकीची स्थानीक पोलीस स्टेशन कडुन रितसर परवानगी घेतल्या जात नाही ही अत्यंत चुकीची बाब आहे. सदर मिरवणुकीची पीलीसांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे या बाबत नागरिक अनभिज्ञ असल्याचे दिसुन येत आहे.

त्यामुळे ते कोणतीही परवानगी न घेता लग्नाच्या वरातीची मिरवणुक स्वाधिकारात काढतात, या बाबीला पायबंद घालणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या स्वाक्षरी ने उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांव/मलकापुर सह पो.स्टे. प्रभारी अधिकारी,

खामगांव शहर, खामगांव ग्रामीण, शिवाजी नगर, शेगांव शहर, शेगांव ग्रामीण, जलंब, हिवरखेड, पिंपळगाव राजा, मलकापुर शहर, मलकापुर ग्रामीण यांना पत्र देण्यात आले आहे.त्यानंतर ची ही पहिली कार्यवाही जळगाव जा पोलिसांनी केली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT