Bachchu Kadu  sakal
अकोला

Bachchu Kadu : बंद दाराआड नाही, मैदानात उमेदवारी देतो...कारंजात बच्चू कडू यांनी दिले महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत

सकाळ वृत्तसेवा

कारंजा (घाडगे) (जि. वर्धा) : प्रहार असा पक्ष आहे जो मैदानात सर्वांसमोर उमेदवारी जाहीर करतो. हा पक्ष बंद दाराआड उमेदवारी जाहीर करत नाही. सत्ता बदलात तिसऱ्या आघाडीला महत्त्व आहे. हे संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी विसरू नये, असा टोला माजी मंत्री बच्चू कडू यांनी येथील सभेत देत महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले.

येथील आठवडी बाजार परिसरात शनिवारी (ता. २८) प्रहारचा मेळावा आयोजित होता. यावेळी ते बोलत होते. या सभेला पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत माजी मंत्री बच्चू कडू यांनी जय बेलखेडे यांची आर्वी विधानसभेकरिता उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या आर्वी विधानसभेत त्यांनी शंख फुंकला. त्यांचा उमेदवार रिंगणात आल्याने आर्वी विधानसभेत चुरशीची लढत होणार आहे. २८८ नाही तर १० आमदार जरी प्रहारचे महाराष्ट्रात निवडून आले तरी मुख्यमंत्री गणपती केल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.

आम्ही सध्या एकटेच आहो. तरी सुद्धा विधानसभेमध्ये तुमचा आवाज उचलत राहतो. माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आहे. सर्वसामान्यांसाठी आणखी गुन्हे वाढले तरी हरकत नाही. ११५ वेळा मी रक्तदान केले. कोण्या राजकीय नेत्याने केले का? असा सवालही त्यांनी केला. यावेळी त्यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश झाला.

प्रहारची महाराष्ट्रातील पहिली उमेदवारी जाहीर

कारंजा येथे झालेल्या सभेत बच्चू कडू यांनी आर्वी विधानसभेकरिता जय बेलखोडे यांची उमेदवारी जाहीर केले. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपची येथे सत्ता आहे. ही उमेदवारी प्रहारची महाराष्ट्रातील पहिली ठरली. बच्चू कडू यांनी केवळ उमेदवारी जाहीर केली नाही तर निवडून आणण्याचीही हमी दिली.

अब हमारा राज आयेगा

संजय राऊत बोलले तिसरी आघाडी म्हणजे पैसे खाणारी आघाडी. संजय राऊत आणि जयंत पाटील यांना सांगतो जेव्हा शरद पवार काँग्रेस मधून फुटले तेव्हा राष्ट्रवादी तिसरी होती विसरू नका. जेव्हा भाजप आणि काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना तिसरी होती. दिल्ली मध्ये केजरीवाल निवडून आले तेही तिसरेच होते. ममता बॅनर्जी तिसरीच होती, अब हमारा राज आयेगा ओ भी तिसरा होगा, असा इशारा त्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: नागपूर विमानतळावर नितेश राणेंविरोधात शिवसैनिकांचे घोषणाबाजी

SL vs NZ, 2nd Test: श्रीलंकेचा मोठा उलटफेर! न्यूझीलंडला डावाने हरवत कसोटी मालिकेतही दिला व्हाईटवॉश

Ulhasngar: उल्हासनगर महानगरपालिकेच्या 4 शाळांना मिळणार आदर्श लूक, आयुक्त विकास ढाकणे यांचा संकल्प

Sushant Shelar : "म्हणून मी बारीक झालो" ; आजारपणाच्या चर्चांवर मौन सोडत सुशांत शेलारचं स्पष्टीकरण

PM Modi Metro Inauguration: नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो आणि राज्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

SCROLL FOR NEXT