katepurna dam water storage 84 percent four door open to discharge water akola monsoon sakal
अकोला

Katepurna Dam : अकोल्यातील ‘काटेपूर्णा’चे चार गेट उघडले

काटेपूर्णा धरणाच्या क्षेत्रात सतत पाऊस झाल्याने साठा वाढला. या प्रकल्पात सध्या ७३.३२२ दलघमी साठा निर्माण झाला असून एकूण साठ्याच्या ८४.९१ टक्क्यांपर्यंत ही पातळी पोचली.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हयातील प्रमुख प्रकल्प असलेल्या काटेपूर्णामध्ये मागील आठवडाभरात जोरदार साठा वाढला असून अपेक्षित पातळी गाठल्याने या धरणाचे शुक्रवारी (ता. दोन) चार गेट ३० सेंटीमिटरने उघडून विसर्ग करण्यात येत आहे. नदीपात्रात हा विसर्ग सुरु आहे.

जिल्हयातील काटेपूर्णा या प्रमुख धरणाच्या क्षेत्रात सतत पाऊस झाल्याने साठा वाढला. या प्रकल्पात सध्या ७३.३२२ दलघमी साठा निर्माण झाला असून एकूण साठ्याच्या ८४.९१ टक्क्यांपर्यंत ही पातळी पोचली. आॅगस्ट महिन्यातील अपेक्षित जलसंचय पातळी ओलांडल्याने याप्रकल्पातून शुक्रवारी चार गेट ३० सेंटीमिटरने उघडून प्रतिसेंकद ९२.२३ घनमीटर एवढा विसर्ग केला जात आहे.

अकोला जिल्हयात काटेपूर्णा हा सर्वात मोठा व प्रमुख प्रकल्प आहे. याप्रकल्प क्षेत्रात आजवर ४२५ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे जुलैत धरणातील साठा झपाट्याने वाढला. सुमारे ६० टक्के धरण या महिन्यात भरले. यामुळे आता पावसाचे पुढील दोन महिन्यांचा कालावधी पाहता प्रकल्पातील साठा नियंत्रित प्रमाणात ठेवण्यात येत आहे.

सध्याच्या साठ्याची स्थिती पाहता हा प्रकल्प यंदा लवकरच १०० टक्के पातळी गाठेल अशी शक्यता आहे. या प्रकल्पातून अकोला महानगराची पाणी पुरवठा योजना तसेच रब्बीत सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी आरक्षित ठेवलेले असते. या दोन्ही बाबींची पाण्याची चिंता आता मिटली आहे.

‘वाण’ही वाढीच्या मार्गावर

जिल्हयातील ‘वाण’ या प्रकल्पाच्या साठ्यातही आता वाढ होऊ लागली. या प्रकल्पाचे क्षेत्र हे सातपुड्यात असून तिकडे सतत पाऊस होत आहे. या पावसाचा फायदा वाण प्रकल्पाच्या साठ्यात वाढ होण्यास झाला. शुक्रवारी (ता.दोन) सकाळपर्यंत ४०.९१ टक्के साठा तयार झाला होता. या आठवड्यात वाण प्रकल्पाचा साठा वाढीला लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT