Khadan police station constable ganesh dukare in ACB trap crime akola Sakal
अकोला

Akola : खदान पोलिस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत; पोलिस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात, चंगू मंगूही रडारवर

खदान पोलिस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील महिन्यातच तत्कालीन ठाणेदार धनंजय सायरे यांच्यावर नागपूरात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज ठाण्यातील एक पोलिस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरातील खदान पोलिस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील महिन्यातच तत्कालीन ठाणेदार धनंजय सायरे यांच्यावर नागपूरात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज ठाण्यातील एक पोलिस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. दरम्यान ठाणेदार गजानन धंदर यांना संपर्क केला असता ते पोलिसांच्या परिक्षेत व्यस्त असल्याची माहिती मिळाली.

खदान पोलिस ठाणे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अगदी समोर आहे. तरीसुद्धा याठिकाणच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वागणूकीत काहीच फरक पडलेला दिसत नाही. या ना त्या कारणाने हे ठाणे नेहमीच चर्चेत राहते. ठाणेदार कोणताही येवो त्यांच्यावर ‘चंगू-मंगू’ म्हणून नावलौकिक असलेल्या दोघांची छाया कायम राहते.

आज अकोला लाच लुचपत विभागाने एका व्यक्तीकडून लाच मागितल्या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गणेश डुकरे याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले असून त्यास पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळून ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई अकोला एसीबीचे पोलिस उप अधीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. सदरची कारवाई नरेंद्र खैरनार व त्यांच्या पथकातील संदीप ताले, प्रदीप गावंडे यांनी केली.

चंगू-मंगूही रडारवर

खदान पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले चंगू-मंगूही एसीबीच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे. या दोन कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचे समजते. त्यामुळे याठिकाणी ठाणेदार कुणीही येवो, चालती मात्र यांचीच राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT