kidnapping of business for one crore police arrest five accused Sakal
अकोला

Akola Crime News : एक कोटी रुपयासाठी व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांनी ठोकल्या पाच आरोपींना बेड्या

योगेश फरपट

Akola News : शहरातील प्रसिद्ध व्यापारी अरुणकुमार मघणलाल वोरा यांचे एक कोटी रुपयासाठी अपहरण झाले होते. अपहरण करणाऱ्या आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेने ५० तासात छडा लावला.

अरुणकुमार वोरा सुखरुप घरी पोहचले असून पोलिसांनी याप्रकरणात २ देशी पिस्टलसह कार जप्त केली आहे. वोरा कुटूंबियांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात पोहचत पोलिस अधिक्षक बच्चनसिंह यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांच्यासह सहकारी पोलिसांचे आभार मानले.

सविस्तर असे की, अरुणकुमार वोरा हे १३ मेरोजी त्यांचे रायलीजीन येथील दुकाण बंद करून घरी जात असता अनोळखी ०२ ते ०३ ईसमांनी त्यांना जबरदस्ती पांढऱ्या कारमध्ये कोंबुन त्यांचे अपरहण केले होते. याप्रकरणी रामदास पेठ पोलिस स्टेशनला अप नं २०० / २४ कलम ३६५, ३४ भा. दं.वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता अपहृत अरुणकुमार वोरा यांचा शोध तसेच त्यांचे अपहरण करणारे अनोळखी आरोपी यांना निष्पन्न करण्यासाठी पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पो.नि. शंकर शेळके यांना गुन्हा उघडकीस आणून व्यापाऱ्याचा शोध घेण्यासाठी सुचित केले.

त्यानुसार स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथे ०२ पथके गठीत करण्यात आली. गोपनिय बातमीदार, तांत्रिक विश्लेषन व्दारे १५ मेरोजी गुप्त बातमीदारामार्फेत माहीती मिळाली की आरोपी मिथुन उर्फ मोंटी सुधाकर इंगळे रा. जुना आळशी प्लॉट, किशोर पुंजाजी दाभाडे रा. ग्राम कळंबेश्वर ता जि. अकोला, फिरोज खान युसूफ खान रा. जुना आळशी प्लाट , शरद पुंजाजी दाभाडे रा. ग्राम कळंबेश्वर,

अशिष अरविंद घनवाहादुर रा. बोरगाव मंजु, राजा सरफराज खान रा. कान्हेरी सरप, चंदु इंगळे रा. खदान अकोला, चंदूचा मित्र नाव माहीती नाही असे यांनी अरून कुमार वोरा यांचे अपहरण केले आहे. आरोपीतांचे पत्यावर जावून त्यांचा शोध घेतला असता, मिळून आले नाही.

काही वेळातच माहीती मिळाली की, अपहृत अरुणकुमार वोरा हे त्यांचे घरी परत आलेले आहेत. अपहृत अरुणकुमार वोरा याचे घरी जावून त्यांना विचापूस केली असता त्या ठिकाणी त्यांचे कडून माहीती मिळाली की,

त्यांना कान्हेरी सरफ येथे एका घरात कोंडून ठेवले होते, अपहरण करणा-या आरोपीनेच त्यांना धमकी देवून अॅटो मधे बसवून अकोला कडे पाठविले. कान्हेरी येथील आरोपी असल्याबाबत माहीती मिळाल्यानुसार आरोपीतांचा पुन्हा शोध घेवून यापैकी पाच आरोपीना पोलिसांनी अटक केली. सर्वानी कट रचुन गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

१५ मेरोजी २३.४० वा. चे सुमारास आरोपी व अरुणकुमार वोरा हे कान्हेरी सरप येथे हजर असतांना आरोपीतांना पोलीस मागावर असल्याची खात्री झाल्याने त्यांनी अपहृत अरुणकुमार वोरा यांना ॲटो ने घरी पाठविले होते.

ज्या अॅटोने अरुण वोरा घरी आले त्या अॅटोचालकाला स्था.गु.शा. अंमलदार यांनी ताब्यात घेवुन गोपनिय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे यातील आरोपी यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून सकाळी ०५ वाजेपर्यंत ताब्यात घेवुन त्यांचे कडुन गुन्हयात वापरलेले ०२ देशी पिस्टल, वाहन,

मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सतीष कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शंकर शेळके, पो. नि. मनोज बहुरे पो.स्टे रामदास पेठ यांचे मार्गदर्शनात, पोउपनि गोपाल जाधव स्थागुशा.,

पो. अमलदार गणेश पांडे, फिरोज खान, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, गोकुल चव्हाण खुशाल नेमाडे, विशाल मोरे, भास्कर धोत्रे, सुलतान पठाण, उमेश पराये, प्रमोद डोईफोडे, वसीमोद्दीन शेख, एजाज अहेमद, आकाश मानकर, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर,

लिलाधर खंडारे, स्वप्नील खेडकर, अन्सार अहेमद, राहुल गायकवाड, स्वप्निल चौधरी, उदय शुक्ला, भिमराव दिपके, अशोक सोनोने, सतिष पवार, चालक पो.हवा प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, अनिल राठोड तसेच सायबर घे आशिष आमले, गोपाल ठोंबरे यांनी केली. शहरातील व्यापारी वर्गातूनच नव्हेतर नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसा होत आहे.

आरोपी नामे मिथुन उर्फ मोंटी सुधाकर इंगळे, आरोपी किशोर पुंजाजी दाभाडे, आरोपी फिरोज खान युसूफ खान, आरोपी शरद पुंजाजी दाभाडे, आरोपी अशिष अरविंद धनबाहादुर या सर्व आरोपीतांची गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याचे दिसुन आले असुन त्यांचेवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असुन घटनेत भा.दं.वि. कलम ३६४ (अ), तसेच आर्म अॅक्ट कलम ३, २५ प्रमाणे कलम वाढ करण्यात येत आहे.

खंडणी मागितल्यास येथे करा संपर्क

जिल्हयातील जनतेस व व्यापारी संघटनेस पोलीस अधीक्षक सा. अकोला यांचे तर्फे आवाहान करण्यात येत आहे कि, खंडणीच्या संबधाने कोणीही मागणी केल्यास अथवा त्रास दिल्यास पोलीस अधीक्षक सा. अकोला तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अकोला मो. न. ९९२१०३८१११ यांना संपर्क साधावा असे आवाहन पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे.

कारसह देशी बनावटीची पिस्टल जप्त

त्यांनी गुन्हयात वापरलेले वाहन, हत्यार अग्निशस्त्र (०२ देशी बनावटीचे पिस्टल), व ईतर साहीत्य काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले. सदर आरोपीतांना पैश्यांची गरज असल्याने त्यांनी ०१ करोड़ खंडणी साठी अरुणकुमार वोरा यांचे कट रचून अपहरण केले होते. परंतु अपहरण करतांना अरुणकुमार वोरा यांचा मोबाईल घटनास्थळावरच पडल्यामुळे अरुण वोरा यांचे घरी आरोपींना सपंर्क साधता आला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT