बुलडाणा : आपली लढाई एका व्यक्तीविरोधात किंवा संस्थे विरोधात नसून राजकीय भ्रष्टाचार विरोधात आहे. सत्तेचा दुरुपयोग करून गैरव्यवहार करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ४० भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर काढणार आहे. यामध्ये अनेक मोठे मासे गळाला लागतील, असा विश्वास भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.
सोमय्या यांनी यापूर्वीच जाहीर केल्यानुसार शुक्रवारी बुलडाण्यात येऊन बुलडाणा अर्बनमध्ये माहिती घेतली व पत्रकार परिषदेत माहिती दिली. राज्यातील आघाडीचे सरकार हे अलिबाबा आणि चाळीस चोरांचे सरकार आहे. यापैकी २४ जणांची प्रकरणे आपण उघडकीस आणत आहोत. ३१ डिसेंबरपर्यंत चाळीस जणांना आपण उघडे पाडणार आहोत, असेही ते म्हणाले. सर्वसामान्यांचा पैसा चोरट्यांच्या घशात जायला नको या भूमिकेतून लढाई लढत आहे, असेही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्यांना संस्थेने कर्जपुरवठा केलेला आहे. मात्र, नांदेड शाखेअंतर्गत अनेक व्यवहार हे संशयास्पद आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. बुलडाणा अर्बनचीही सहकार्याची भूमिका आहे. तसेच आयकर विभाग देखील चौकशी करीत आहे. त्यामुळे या विषयावर आपण जास्त बोलणार नाही.
ठाकरे सरकारवर ठपका
पेट्रोलच्या प्रति लीटर मागे तीस रुपये ठाकरे सरकारला मिळतात. इतर राज्यांनी ज्याप्रमाणे आपला वाटा कमी केला त्याप्रमाणे या सरकारने सुद्धा तो केला पाहिजे. एसटीचे कर्मचारी असो किंवा अडचणीत आलेल्या सर्वसामान्य शेतकरी असो या सर्वांची फिकीर राज्य सरकारला नाही. हे सरकार केवळ घोटाळेबाजांचे कडबोळे झाले आहे.
... तोपर्यंत शांत बसणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे, मिलिंद नार्वेकर यांच्या नावे अनेक अधिकृत, अनधिकृत बंगले आहेत. याशिवाय मिलिंद नार्वेकर, आनंदराव अडसूळ, काँग्रेसचे अनिल देशमुख, अनिल परब अशी एक ना अनेक नावे सांगता येतील. ज्यांनी केवळ सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला आहे. तो उघड झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.