Ladki Bahin Yojana sakal
अकोला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण, पैसे घेणारा तलाठी निलंबित

Akola Crime: सकाळ आॅनलाईनच्या बातमीची दखल, एसडीओंची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Crime: ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी व कामकाजातील त्रुटींमुळे उमरी प्र. बाळापूर येथील तलाठी राजेश शेळके यांना तात्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी हा आदेश जारी केला. तलाठी शेळकेंचा पैसे घेतानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सकाळने प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही कारवाई केली.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी महिलांकडून मोठी उमरी येथील तलाठी पैसे घेत असल्याची बातमी सकाळ माध्यम समूहाच्या आॅनलाईन टिमने व साम टिव्हीने प्रकाशित केली. त्यानंतर संबंधी तलाठ्यांना तत्काळ नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यांनी अद्याप खुलासा सादर केला नाही.

त्यांच्या दप्तराची तपासणी करण्यात आली, तसेच साझ्याचे ठिकाणी ८ नागरिकांचे बयाणही घेण्यात आले. तलाठ्यांनी उत्पन्न दाखल्यासाठी 30 रू. ची मागणी केली, असे बयाण नागरिकांनी दिले. दप्तर तपासणीत शेळके यांच्या कामात विसंगती आढळून आली, दप्तरात दैनंदिनी, कार्यालयात आदर्श तक्ता नसणे आदी अनेक त्रुटी आढळून आल्या.

शासकीय कामात हलगर्जीपणा, सचोटी न राखणे व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार तलाठी राजेश शेळके यांना निलंबित करण्यात आले आहे. अकोल्याचे ‘एसडीओ’ डॉ. शरद जावळे यांनी ही कारवाई केली.

पैसे घेतल्यास कारवाई

लाडकी बहिण योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. या योजनेचे घोषणा झाल्यानंतर महा ई-सेवा केंद्रांवर अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव नागरिकांकडून सुरू आहे. अशात काही ठिकाणी दाखल्यांसाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. कोणत्याही दाखल्यासाठी पैसे घेतल्यास कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

--------------

३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा, तसेच काही निकष शिथील करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. सर्व पात्र व गरजू महिलांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे महिलाभगिनींनी कुठेही गर्दी करू नये. जिल्ह्यात नियोजनबद्ध रीतीने प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT