voting sakal
अकोला

Loksabha Election Result : मतदारांना आता निकालाची प्रतीक्षा; नवा खासदार लवकरच जनतेच्या सेवेत

सकाळ वृत्तसेवा

- मिलिंद जामनिक

मूर्तिजापूर - अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या लोकशाहीच्या उत्सावाचे ०६-अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता ०३२- मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ता. २६ एप्रिल रोजी मतदान उत्साहपूर्वक शांततेत पार पडले. परंतु, निकालाचा अंदाज लावण्याकरिता गावातील पारावर चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे. परंतु, जनतेच्या सेवेसाठी नवा खासदार निवडून येण्यासाठी मतदारांना ता. ४ जूनचीच प्रतिक्षा करावी लागणार आहे.

देशाच्या भवितव्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी लोकसभा निवडणुकीसाठी ०६-अकोला लोकसभा मतदारसंघासाठी ता. २६ एप्रिल रोजी ०३२-मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत मतदान पार पडले.

यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या उत्कृष्ट नियोजनात तहसीलदार शिल्पा बोबडे, नायब तहसीलदारद्वय उमेश बनसोड व रवी राऊत तसेच त्यांच्या प्रशासनातील सर्वच सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने मतदारसंघात कुठलीही विपरीत घटना न घडता लोकशाहीच्या उत्सवात मतदारराजा हा स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवून उत्साहपूर्ण वातावरणातून दिसून आला.

सकाळी सात वाजता सुरुवात झालेल्या मतदानाला दिवसभर ग्रामीण भागासह शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला. यावरून अकोला लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे अनुप धोत्रे, महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर या तिघांसाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसला.

यावरून संबंधित उमेदवारांचे गावागावात असलेले कार्यकर्ते यांच्या या मतदानावरून वेगवेगळ्या प्रकारचे तर्क-वितर्क लावल्या जात असून, यांच्या चर्चा गावाच्या पारावर रंगताना दिसत आहेत. जो-तो आपली बाजू भक्कम म्हणून आमचे उमेदवार निवडून येतात, असा आत्मविश्वास बोलून दाखवत आहे. त्यामुळे या रंगणाऱ्या चर्चेत शेवटी ता.४ जून रोजी येणारा निकाल हा पाहणं औचित्याचा ठरेल.

यावेळेसचा मतदारांचा कौल पाहता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा विजय निश्चीत आहे.

- सतीश गवई, वंचित बहुजन आघाडी, खापरवाडा.

मतदारांचा प्रतिसाद पाहता महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या विजयाच्या रथाला कोणी रोखू शकणार नाही.

- अविनाश साबळे, भाजप, टिपटाळा.

मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हमखास यश मिळणार आहे. यामध्ये काही शंका नाही. महाविकास आघाडीचे डॉ.अभय पाटील भरगच्च मतांनी निवडून येतील, असा विश्वास आहे.

- बंडूभाऊ डाखोरे, काँग्रेस, हिवरा कोरडे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT