Akola Agriculture sakal
अकोला

Akola News : अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यातील १०,५०६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान ,१३ कोटींची मदत मंजूर

Akola News : जून-जुलै २०२४ मध्ये अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यातील १०,५०६ शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते. शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२.९ कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात जून ते जुलै २०२४ दरम्यान झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त दहा हजार ५०६ शेतकऱ्यांसाठी शासनाने १२ कोटी ९० लाख १७ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. याबाबतचा शासनादेश राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने जारी केला.

गतवर्षी जुलै महिन्यात सुरु झालेल्या अतिवृष्टी व नंतर अवकाळी पावसाचा मुक्काम एप्रिल महिन्यातही संपला नाही. गत खरीप हंगामाात अतिवृष्टीमुळे १ लाख ६८ हजार ९३७.१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले हाेते. त्यानंतर नाेव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील एक लाख ८९ हजार ६८१ हेक्टरवर पिकं बाधित झाली. फेब्रुवारी महिन्यातही अवकाळीमुळे ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली.

९ एप्रिल नंतर १० व ११ एप्रिल राेजीही गारपीट व अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसला. दरम्यान यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त क्षेत्राचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागामार्फत संयुक्त पंचनामे करून सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर मदतीची मागणी शासनाकडे करण्यात आली.

त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने १२ कोटी ९० लाख १७ हजार रुपये मंजूर केले आहेत. त्याचा फायदा दहा हजार ५०६ शेतकऱ्यांना मिळेल. जून ते जुलै २०२४ मध्ये नऊ हजार ४७१.५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आता मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

असे झाले होते नुकसान

  • तालुका गाव शेतकरी निधी (लाखात)

  • बार्शीटाकळी ५८ २३७० १९८.३९

  • अकोला ६८ ६६३३ ८४८.८५

  • मूर्तिजापूर ८ ४७१ १६.०७

  • पातूर १४ १००८ २२४.३०

  • अकोट ४ २४ ३.०३

  • एकूण १५२ १०५०६ १२९०.६४

अशी आहे स्थिती

  • या पिकांचे नुकसान ः कपाशी, सोयाबीन, तूर

  • नुकसानग्रस्त गावे ः १५२

  • नुकसानग्रस्त शेतकरी ः १०५०६

  • नुकसानग्रस्त क्षेत्र ः ९४७४.३७

  • निधी मंजूर ः १२ कोटी ९० लाख ६४ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT