maharashtra state board hsc result Akola district 12th result is 95 percent Google
अकोला

अकोला जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९५.८४ टक्के

बार्शीटाकळी, अकोट तालुक्यात सर्वाधिक ९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. ७) दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यात अकोला जिल्ह्यातून एकूण २४ हजार ८६९ म्हणजे ९५.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ९७ टक्के निकाल अकोट व बार्शीटाकळी तालुक्याचा लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. ७) दुपारनंतर जाहीर करण्यात आला. अकोला जिल्ह्यातून बारावीसाठी चारही शाखांमध्ये एकूण २६ हजार ४७ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षे अर्ज भरला होता. त्यापैकी २५ हजार ९४७ विद्यार्थ्यांनी मार्चमध्ये परीक्षा दिली. त्यातील २४ हजार ८६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुले १३ हजार १८१ असून, मुली ११ हजार ६८८ आहेत. अकोला जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एकूण प्रमाण ९५.८४ टक्के आहे.

टक्केवारीत मुलींची बाजी

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या जास्त असली तरी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये टक्केवारीत मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील उत्तीर्ण मुलींचे प्रमाण ९७.१५ टक्के आहे. उत्तीर्ण मुलांचे प्रमाण ९४.७१ टक्के आहे.

जि.प. कनिष्ठ महाविद्यालयाचे यश

जिल्ह्यातील १५० वर्षे जुनी असलेली शैक्षणिक संस्था जिल्हा परिषद आगरकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९८.५९ टक्के लागला आहे. यात विद्यान शाखेचा निकाल १०० टक्के असून, कला शाखेतील ८७.५० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ५१ विद्यार्थ्यांनी डिस्टिक्शनसह उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. कला शाखेची श्रुष्टी गजानन भिसे ८०.५० टक्के गुण मिळवून प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाली. वाणिज्य शाखेतून साहिल जयकुमार सिरसाट ६६ टक्के गुण मिळवून प्रथम आला. विज्ञान शाखेतून वेदांत अविनाश तायडे ९३ व ओम सावरकर ९२ टक्के तर आस्था चव्हाण ९१ टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाली.

जिल्ह्यातील निकाल

तालुका नोंदणी परीक्षा दिली उत्तीर्ण मुले उत्तीर्ण मुली एकूण उत्तीर्ण टक्केवारी

अकोला १०,७०२ १०,६६३ ५,२६२ ५,०५७ १०, ३१९ ९६.७७

अकोट ३,४७६ ३,४६८ १,७७४ १,५९६ ३,३७० ९७.१७

तेल्हारा १,८२० १,८०७ ६६२ ८२४ १,४८६ ८२.२३

बार्शीटाकळी २,७६३ २,७५० १,६०३ १०७४ २,६७७ ९७.३४

बाळापूर २,६८३ २,६७५ १,३९० १,२०१ २,५९१ ९६.८६

पातूर २,४६४ २,४५७ १,४०१ ९७९ २३८० ९६.८६

मूर्तिजापूर २,१३९ २,११२ १,०८९ ९५७ २,०४६ ९६.१९ ......................................................................................................................................

एकूण २६,०४७ २५,९४७ १३,१८१ ११,६८८ २४,८६९ ९५.८४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT