चरणगाव (जि. अकोला) - ‘ज्या जातींना आरक्षण मिळाले, त्यांनी आरक्षण नसलेल्या गोरगरिबांना बहाणे सांगू नये. त्यांचा तळतळाट लावून घेऊ नका. २४ डिसेंबरला सरसकट आरक्षण न दिल्यास तुम्हाला जड जाईल, हे सरकारनेही लक्षात घ्यावे. विरोधात जाणाऱ्यांना आम्ही कधीही सोडणार नाही,’ असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे सकल मराठा समाजातर्फे आयोजित सभेत ते बोलत होते.
जरांगे म्हणाले, ‘‘आरक्षण असलेले व नसलेले हे दोघेही भाऊच आहेत. आता आरक्षण नसलेल्यांना ते मिळवून देण्यासाठी तुम्ही पाठीशी उभे राहायला हवे, हे आवाहन करण्यासाठी विदर्भ, खान्देशात फिरत आहे. येथे आल्यापासून ओबीसीत ज्या छोट्याछोट्या जाती आहेत, त्यांना लाभ मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे असल्याचे सांगत आहेत. मराठ्यांची मुले मोठी व्हायला नकोत, असे काहींना वाटत आहे.’’
काळे झेंडे दाखवून जरांगे यांचा निषेध
वाशिम - सभेनिमित्त विदर्भात आलेल्या जरांगे यांचा वाशिम-अकोला मार्गावरील पाटील ढाब्याजवळ मंगळवारी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला. मराठा आरक्षणासाठी जरांगे ज्या सभा घेत आहेत त्यामधून ओबीसी नेत्यांबद्दल आक्षेपार्ह विधाने करत आहेत, असा आरोप ओबीसी संघटनांनी केला.
या वेळी ओबीसी कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून घोषणाबाजी केली. पोलिसांना आंदोलन होणार हे माहीत असूनही कोणताही अटकाव केला नाही, असा आरोप मराठा संघटनांनी केला.
भुजबळ, महाजन यांच्यावर टीका
या वेळी जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर विविध प्रकारचे दाखले देत सडकून टीका केली. तसेच गिरीश महाजन यांनाही इशारा दिला. विरोधात जाणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. शब्दाचा सन्मान ठेवला याचा गैरफायदा घेऊ नका.
आरक्षणाअभावी मराठ्यांच्या पोरांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. मराठ्यांच्या जिवावरच तुम्हाला हा ऐषआराम मिळाला. मराठ्यांनी मनावर घेतले तर कुणालाही सोडणार नाही. दोन तारखेला उपोषण सोडताना लिहून घेतलेले आहे. त्यात बदल झाला, तर मग तुमचे अवघड आहे, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.