अकोला ः अकोला-अकोट, अकोट-तेल्हारा व तेल्हारा, अकोट तालुक्यातील रस्त्यांची कामे मोठ्याप्रमाणावर रखडली आहेत. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास व त्यातून लोकप्रतिनिधींबाबत नाराजीचा सूर उमटत असल्याने मंगळवारी भाजपच्या आमदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागात धाव घेत अभियंत्यांना धारेवर धरले. ( MLAs meet officials for Akot Road)
रस्त्याच्या कामात अधिकारी आणि ठेकेदार सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत असतील तर हा प्रकार कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला. आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासोबत भाजपच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील रस्ते दोन वर्षांपासून खोदून ठेवले असताना कामांना गती दिली जात नसल्याबाबत आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अभियंता प्रवीण सरनाईक, के. एन. सिंग, के. आर. सिंग, रॉबिन थॉमास, एस. के. पटेल, वैभव वैद्य, नागेश काकड व संबंधित सहाय्यक अभियंता यांची उपस्थिती होती. भाजप महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी सुद्धा रस्त्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. भाजप आमदार व पदाधिकारी बैठकीत आक्रमक झाल्याने कार्यकारी अभियंता गिरीश जोशी यांनी येत्या दोन दिवसात हा प्रश्न निकाली काढण्याचे अभिवचन दिले.
MLAs meet officials for Akot Road
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.