modi govt misuse of ed and cbi says prakash ambedkar politics Sakal
अकोला

Akola News : मोदीच्या कार्यकाळात ईडी सीबीआयचा प्रचंड गैरवापर - प्रकाश आंबेडकर

केंद्रात सत्तेत बसलेल्या मोदी सरकारने दहा वर्षात फक्त टिंगलटवाळी केली आणि मोठ्या प्रमाणात ईडी आणि सीबीआय या यंत्रणेचा गैरवापर केला असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.

योगेश फरपट

अकोला : केंद्रात सत्तेत बसलेल्या मोदी सरकारने दहा वर्षात फक्त टिंगलटवाळी केली आणि मोठ्या प्रमाणात ईडी आणि सीबीआय या यंत्रणेचा गैरवापर केला असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते. ते म्हणाले की, मोदींच्या कार्यकाळात लोकशाही ऐवजी पोलीसी राज्य अस्तित्वात असल्याचे दिसत आहे. या यंत्रणेचा गैरवापर करून अनेकांना वेठीस धरण्याचे काम या सरकारने केले.

विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात ईडी आणि सीबीआयने कारवाई केलेल्या एकाही आरोपीला शिक्षा झाली नाही. याचा अर्थ केवळ भीती दाखवण्यासाठी मोदी शासनाने लोकशाहीच्या विरोधात जाऊन सत्तेचा गैरवापर केला असे सिद्ध होते.

एड आंबेडकर पुढे म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी शंकराचार्यांनी तूर्तास विरोध केला होता मात्र निवडणुका तोंडावर असल्यामुळे शुभ मुहूर्त न पाहता त्यांनी घाई घाईने मंदिराचे उद्घाटन करून टाकले तसेच 400 पार चा नारा देऊन त्यांना संविधान बदलायचे आहे हे स्पष्ट दिसते.

नवीन मतदार वर्ग बीजेपी कडे वळला होता, या मतदारांचा भ्रम निराश झाल्यामुळे त्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी प्रचंड घसरली. मोदी सरकारच्या विरोधातील राग व्यक्त करण्यासाठी मतदारांनी सरकारच्या विरोधात मतदान करून आपला हक्क बजावून सरकारचा निषेध करावा.

शाहू फुले आंबेडकर तसेच मानवतावाद स्वीकारणाऱ्या मतदार वर्गावर आता एक जबाबदारी आली आहे, लोकशाहीच्या नावाखाली जो धिंगाणा मोदींच्या काळात सुरू आहे त्याला कसे थांबवता येईल यासाठी मतदारांनी जागरूक राहून मतदान करावे. या सर्व प्रक्रियेसाठी वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय असून मतदारांनी निर्भीडपणे वंचित बहुजन आघाडीचा मतदान करावे अशी आवाहन त्यांनी केले.

ह्यावेळी पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर, अकोला लोकसभा मिडीया समीती प्रमुख एड नरेंद्र बेलसरे, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT