म्युकरमायकोसीस आजार कसा ओळखाल? गैरसमजच अधिक; घ्या योग्य उपचार google
अकोला

म्युकरमायकोसीस आजार कसा ओळखाल? गैरसमजच अधिक; घ्या योग्य उपचार

सकाळ वृत्तसेवा


अकोला, ः सध्या म्युकरमायकोसीस म्हणजेच काळी बुरशी या आजाराची रुग्णसंख्या वाढते आहे. या आजाराविषयी अनेक समज गैरसमजही दिसून येत आहेत. हा आजार मुख्यतः कोविड उपचारानंतर होतांना दिसून येत आहे. याबाबत शास्त्रीय माहिती व वस्तूस्थिती जाणून घेत उपाचर घेण्‍याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक तथा आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले.
कोरोनाशी युद्ध सुरू असतानाच आता म्युकरमायकोसीस (काळी बुरशी) या आजाराचा सामना करावा लागत आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अथवा मधुमेह नियंत्रणात नाही,अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराची लागण होताना दिसत आहे. मात्र प्रत्येक कोरोनाबाधिताला हा आजार होतोच असे नाही. त्यामुळे घाबरून न जाता त्याविषयी शास्त्रीय माहिती घेऊनच प्रतिबंध करावा. (How do you diagnose myocardial infarction?)


असा ओळखा आजार
या आजाराची प्रमुख लक्षणे ही डोके दुखणे, चेहऱ्याला सूज येणे, ताप येणे, तोंडामध्ये गळू येणे व त्यामधून पू येणे, दातातून पू येणे, दात हलणे जबड्याचे हाड उघडे पडणे, हिरड्यांना सूज येणे व त्यातून रक्त येणे, डोके दुखणे, सायनसेसमध्ये रक्तसंचय आढळणे, डोळ्यांना सूज येणे व हालचाल कमी होणे, चेहऱ्याची त्वचा काळी पडणे, नाकात काळे सुके मल तयार होणे, दात काढल्यानंतर न भरणारी जखम इत्यादी लक्षणे दिसून येतात.

या आहेत उपचारासाठी सुविधा
कोविड व स्टेरॉईडचा तपशील माहिती घेणे आवश्यक. रक्त तपासणी करणे. सी. टी स्कॅन, एन्डोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्युकर मायकोसीसचे निदान करणे सोपे आहे. उपचार पद्धतीत यावर एम्पोटेरेसिन बी या इंजेक्शचा वापर केला जातो व आवश्यकता वाटल्यास शस्त्रक्रिया केली जाते. आपल्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथे विशेषज्ञ उपलब्ध आहेत.

विनामूल्य उपाचार
राज्य शासनाने म्युकरमायकोसीसचा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत केला आहे. त्याअंतर्गत या योजनेशी संलग्न रुग्णालयांमध्ये व शासकीय रुग्णालयांमध्ये या आजारावर विनामूल्य उपचार होतील, अशी व्यवस्था शासनाने केली आहे.



जिल्ह्यात ६६ रुग्ण, पाच रुग्णांचा मृत्यू
अकोला जिल्ह्यात काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) आजाराचे आतापर्यंत ६६ रुग्ण आढळले. ६० जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत. त्यात वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत पाच रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.



ही घ्या काळजी
कोविडमधून बरे जालेल्या रुग्णांना मधुमेहासारख्या आजारांची पार्श्वभूमी असल्यास त्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. रक्तातील साखर नियंत्रीत ठेवावी. मधुमेही रुग्णांनी आणि कोरोनातून बरे झालेल्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण वेळोवेळी तपासावे. औषधोपचारात स्टेरॉईडचा वापर सांभाळून करावा. उपचारादरम्यान ऑक्सिजन वापरण्याची वेळ आल्यास ह्युमीडीफायरमध्ये स्टराईल वॉटर वापरावे.

संपादन - विवेक मेतकर

How do you diagnose myocardial infarction?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT