Ladki Bahin Yojana esakal
अकोला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर सर्व्हर रुसला; महिलांचा हिरमोड

सकाळ वृत्तसेवा

अकोला - राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. यात महिलांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरमहा पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. मात्र, लाडकी बहिण योजनेचे सर्व्हर कधी सुरू तर कधी बंद होत असल्याने अर्ज भरण्यासाठी सीएससी केंद्रावर जाणाऱ्या महिलांचा हिरमोड होत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महिला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी धडपड करत आहे. या योजनेनुसार महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहे. या योजनेचा लभ मिळावा यासाठी सीएससी व सेतू केंद्रांवर महिलांची एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डिजिटल पद्धतीने भरण्याची व्यवस्थाही महिलांसाठी करण्यात आली आहे. तर लाडली बहीण योजनेचे नारी शक्ती ॲप सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत काही ठिकाणी अडचणी येत आहेत.

त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिला चांगल्याच हैराण होत आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना कुठे सर्व्हर डाऊन तर कुठे नारी शक्ती ॲप संथगतीने सुरू असल्याचे समोर येत आहे. अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणींमुळे महिला त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. नाव नोंदणीसाठी बराच वेळ महिलांना ताटकळत रहावे लागत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच ठिकाणी महिलांना अर्ज भरण्यासाठी येत अडचणी आहेत.

एकाच वेळी लाखो अर्ज

लाडक्या बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘नारी शक्ती दूत’ म्हणून मोबाईल ॲप विकसित केले आहे. राज्यभरातुन एकाच वेळी लाखो अर्ज भरले जात आहे. त्यामुळे ॲपवर लोड आल्याने ॲप व सर्व्हर संथगतीने चालत असल्याचे कारण दिले जात आहे. परिणामी महिलांचे अर्ज दाखल होण्यात वेळ लागत आहे.

शेतीच्या कामावर परिणाम

ग्रामीण भागात सध्या शेतीचे कामे सुरू आहेत. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये कामगार, शेतमजूर महिलांची संख्या मोठी आहे. अर्ज करण्यासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागत असल्याने शेतीचे कामे प्रभावित होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT