murtizapur 12th century ram mandir historical evidence akola  Sakal
अकोला

Akola News : मूर्तिजापुरात बाराव्या शतकातील राम मंदीर; जिर्णोद्धारात सापडले होते ऐतिसाहिक पुरावे

सन २००६ मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार सुरू असताना मंदिरातील रामलक्ष्मणाच्या मूर्ती काढण्यात आल्या होत्या.

प्रा.अविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि.अकोला) : बाराव्या शतकात निर्माण झालेल्या येथील येथील जुनी वस्ती परीसरातील श्रीराम मंदिरासंदर्भात अद्भूत आख्यायिका प्रचलीत आहे. या मंदिराच्या निर्माणाचा नेमका कालावधी कुणालाच माहिती नाही. त्याची अधिकृत नोंदही कुठेच नाही, परंतु जुन्या जाणत्यांच्या सांगण्यानुसार ते बाराव्या शतकात निर्माण झाले असावे.

निर्माणानंतरचा त्याचा जिर्णोद्धार १८०३ साली झाल्याचे समजते, मात्र त्यात पुढाकार कोणी घेतला होता, हे कुणालाच माहीत नसल्याचेही सांगितल्या जाते. त्यानंतर मात्र अवकळा प्राप्त झालेल्या या मंदिराच्या जिर्णोद्धाराबाबत एक आख्यायिका प्रचलित आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते कै.शरदचंद्र दुबे यांच्या मातोश्री कै.मंदाकिनी मधुकरराव दुबे यांना स्वप्नात प्रभू रामचंद्राचा साक्षात्कार झाला. त्यामुळे त्यांचे जबलपूरचे जावई राजेश्वर दुबे यांनी सुमारे ११ लाख रुपये खर्चून २००६ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार केला. मंदिराचे विश्वस्त मंडळ अद्याप नोंदवायचे असून, सध्या डॉ.अर्पण दुबे, अभय दुबे, विजय दुबे, प्रशांत हजारी, दिगंबर दीक्षित, चंद्रकांत तिवारी मंदिराचे व्यवास्थापन बघतात.

७५० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक पुरावे

सन २००६ मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार सुरू असताना मंदिरातील रामलक्ष्मणाच्या मूर्ती काढण्यात आल्या होत्या. तेव्हा त्याखाली मोघलकालीन १३ नाणी व शिवकालीन होण आढळला होता. त्यामुळे किमान ७५० वर्षांची परंपरा या मंदिराला निश्चितच असल्याचे मानल्या जाते.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्‍घाटनदिनी ता. २२ जानेवारीला या मंदिरात रामचरण पादुकांची स्थापना करण्यात येणार आहे. आमदार हरीश पिंपळे यांनी मंदिराच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन अलिकडेच मंदिराच्या भेटीदरम्यान दिले आहे.

- डॉ.अर्पण दुबे, राम मंदीर देखरेख समिती सदस्य

शहरातील प्रभू रामचंद्राचे प्राचिन मंदीर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राम हिंदू धर्मिय बांधवांचे दैवत आहे, या मंदिराच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणार.

- हरीश पिंपळे, आमदार, मूर्तिजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT