Nagpur Political  Esakal
अकोला

Akola Loksabha: अकोला मतदारसंघाकडे महाराष्ट्राचं लक्ष, प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस अन् भाजपचं असणार आव्हान

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात थेट तिरंगी लढत होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Akola Lok Sabha Constituency: सोमवारी रात्री काँग्रेसतर्फे डॉ. अभय काशिनाथ पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात थेट तिरंगी लढत होणार आहे.

भाजपाने पहिल्या टपप्प्यातील लोकसभा निवडणूकासाठी अकोला लोकसभा मतदारसंघातून खासदारपुत्र अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहिर केली. दरम्यान महाविकास आघाडी सोबत आघाडी होण्याची शक्यता धुसर झाल्यानंतर वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदार संघातून नामांकन सादर केले. तर काँग्रेसतर्फे आता कोण असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच सोमवारी रात्री काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहिर झाली. त्यामुळे महाविकास विकास आघाडीचा तिढा अखेर सुटला.

भाजपाचे अनुप धोत्रे हे ३ एप्रिल तर काँग्रेसचे डॉ. अभय पाटील हे ४ एप्रिल रोजी नामांकन सादर करणार आहेत. अनुप धोत्रे व डॉ. अभय पाटील हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी सोलापूर मतदार संघातुन उमेदवारी दाखल केली होती. अकोला प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत लोकसभा मतदार संघ असुन या मतदार संघातून त्यांनी दोनदा (१९९८ आणि १९९९) लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे.

पण, इतर सर्व निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला होता हे विशेष. यंदा संपुर्ण राज्याचे लक्ष अकोला लोकसभा मतदार संघाकडे लागले आहे. ही निवडणूक तिन्ही उमेदवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने उमेदवारांना चांगलाच कस या निवडणूकीत लावावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT