अकोला - अविकसित एमआयडीसी, प्रदूषित करणारे कोणतेही मोठे कारखाने नाहीत. त्यानंतरही महानगरपालिका असलेले अकोला शहर राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये आहे. गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने प्रदूषित शहरांमध्ये क्रम लागत असतानाही हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गांभिर्याने उपाययोजना होत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
देशातील १३१ शहर आणि परिसर अतिशय प्रदूषित असल्याचे केंद्र शासनातर्फे मार्च २०२३ मध्ये जाहिर करण्यात आले होते. या १३१ शहरात हवेची गुणवत्ता ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक खराब आहे. केंद्र सरकारकडून या शहरातील हवेच्या गुणवत्तेवर वारंवार नजर ठेवली जात आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या शहरांना ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’ अंतर्गत ठेवण्यात आले आहे. जेणेकरून या शहरातील हवेची गुणवत्ता सुधारता येईल. अकोला शहरातील ‘पार्टिक्यूलेट मॅटर’ (कण द्रव्य) मध्ये २० ते ३० टक्के घट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य २०२४ ते २०२८ या काळासाठी ठेवण्यात आले आहे.
उपाययोजनांकडे दुर्लक्ष
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदूषित शहरांची यादी सादर करूनही त्याची गांभीर्याने दखल न घेतली गेल्याबद्दल सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्राने निश्चित केलेल्या मानकानुसार, ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’ चं वार्षिक सरासरी प्रमाण ६० आणि नायट्रोजन डॉयऑक्साइडचं वार्षिक सरासरी प्रमाण ४० पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहर म्हटलं जातं. त्यात अकोला शहरांचा समावेश आहे.
का खराब झाली या शहराची हवा!
वाहतुकीची कोंडी, वाहनांमधून निघणारा धूर
कालबाह्य झालेल्या वाहनांमधून निघणारे घातक धूर
रस्त्यांवरील धुळी कणांचे प्रमाण अधिक
उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर न करणे
अकोला शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही
अकोला शहरात ऑटो रिक्षांची सर्वाधिक संख्या (यात सर्वाधिक कालबाह्य वाहनांची संख्या आहे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.