अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैदयकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीला बर्थ डे केक ऑनलाईन पध्दतीने बोलावणे चांगलेच महागात पडले आहे. तरुणीने केकची ऑर्डर केल्यानंतर गुगल पेच्या माध्यमातून २८० रुपये दिल्यानंतर मात्र तरुणीच्या खात्यातून तब्बल ९५ हजार १९ रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण सायबर पोलिसांकडे वळते केले.
सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, रचिता रतन मोवाल रा. नागपूर ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचे अकोला येथे शासकीय महाविद्यालयात वैदयकीय शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला शिकत असून मुलींच्या वसतिगृहात वास्तव्यास आहे.
वसतिगृहात वाढदिवसाच्या निमित्ताने ता. १४ ऑक्टोबर रोजी तरुणीने आनंद बेकरी इथे बर्थडे केक ऑनलाईन बुक केला होता. याकरिता गुगलपेच्या माध्यमातन २८० रुपयेही अदा करण्यात आले होते. परंतु तरुणीकडे केक पोहचण्या अगोदरच डॉक्टर तरुणीच्या खात्यामधून पहिल्या टप्प्यात १८ हजार रुपये व दुसऱ्या टप्प्यात ६८ हजार १९ असे एकूण ९५ हजार १९ रुपये अज्ञात भामट्याने लंपास केले.
तरुणीच्या खात्यातून रक्कम वळती केल्याचे मॅसेज मोबाईलवर प्राप्त होताच तरुणीने सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांकडे आपबीती कथन करून फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.