अकोला : कोरोना संसर्ग तपासणीचे (corona update akola) (आरटीपीसीआर) ३१० अहवाल प्राप्त झाले. त्यातील सर्वच ३१० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या रॅपीट अँटिजेन चाचणीत (antigen test akola) मात्र एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अहवालांची संख्या व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बघता अकोला कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. (only one patient found corona positive in akola)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण तीन लाख चार हजार २५९ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे तीन लाख ७१७ फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे तीन हजार १४५ नमुने होते. आजपर्यंत एकूण तीन लाख चार हजार १४६ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या दोन लाख ६० हजार ९७० आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचा दिवसभरात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात ता. २८ जुलै रोजी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.
५४ जणांवर उपचार सुरू -
जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४ जणांवर उपचार सुरू आहेत. दररोज प्राप्त होत असलेल्या अहवालांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक आकडी होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.