Water level at Dam  Sakal
अकोला

दहा दिवसांत धरणात वाढला फक्त एक टक्के जलसाठा

सकाळ वृत्तसेवा

अकोला: यंदाच्या पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी जिल्ह्यातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. एकीकडे राज्यात पावसाचे धुमशान सुरू असताना गेले दहा दिवसांत अकोला जिल्ह्यातील पाणीसाठ्यात अवघ्या एक टक्क्याने वाढ झाली आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत समधानकार जलसाठा आहे.

अकोला जिल्ह्यात दोन मोठे व इतर मध्यम व लघू प्रकल्प आहेत. त्यापैकी काटेपूर्णा व वाण हे दोन प्रमुख जलसाठे आहेत. ता. १ जुलैच्या तुलनेत या दोन्ही प्रकल्पात केवळ एक टक्क्याने पाणी वाढले आहे. ता. ११ जुलै रोजी काटेपूर्णा प्रकल्पात ३०.१६ टक्के उपयुक्त जलसाठा होता. गतवर्षी याच तारखेला काटेपूर्णात २७.१४ टक्के जलसाठा होता. वाणमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणी आहे. गतवर्षी ता. ११ जुलैपर्यंत वाणमध्ये २९.४० टक्के जलसाठा होता. तोच यावर्षी ४३.०८ टक्के आहे. ता. १ जुलैला काटेपूर्णामध्ये २९.९ तर वाणमध्ये ४०.८८ टक्के जलसाठा होता.

घुंगशीचे सर्व दरवाजे उघडले

पूर्णा नदीवर मूर्तिजापूर तालुक्यामध्ये असलेल्या घुंगशी बॅरेजचे दरवाजे गेले आठ दिवसांपासून उघडलेले आहेत. पूर्णा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्याने या बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले होते. पाण्याचा प्रवाह वाढतच असल्याने दरवाजे उघडेच ठेवण्यात आले आहे.

संततधार पाऊस

काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. रविवारी काही भागात रिमझिम पाऊस झाला तर सोमवारी सकाळी ११.३० वाजतानंतर पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी १० वाजता संपलेल्या २४ तासात अकोला जिल्ह्यात सरासरी ०.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.

मध्य प्रकल्पांची स्थितीही कायम

गेले तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी अकोला जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात अधिक जलसाठा असला तरी पावसाळ्यातील दीड महिना उलटूनही मध्य प्रकल्पातील पाण्याची स्थिती कायम आहे. निर्गुणा प्रकल्पात ११ जुलैपर्यंत २६.४१ टक्के जलसाठा होता. २०२१ मध्ये १४.७० तर २०२० मध्ये अवघा ६.५० टक्के जलसाठा होता. हिच स्थिती मोर्णा प्रकल्पाबाबतही आहे. मोर्णा प्रकल्पात ३८.४५ टक्के जलसाठा आहे. २०२१ मध्ये याच तारखेला ३२.४४ तर २०२० मध्ये २२.२८ टक्के जलसाठा होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT